Shreyas Iyer : BCCI ने श्रेयस अय्यरवर सोपवली मोठी जबाबदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दिसणार नव्या भूमिकेत

Shreyas Iyer captains India A : भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध होणाऱ्या दोन अनधिकृत कसोटी सामन्यांसाठी भारतीय ‘अ’ संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्धच्या दोन अनधिकृत कसोटी सामन्यांसाठी भारतीय ‘अ’ संघाची घोषणा करण्यात आली आहे. श्रेयस अय्यरला एशिया कपसाठी संघात स्थान मिळाले नाही, त्यानंतर बीसीसीआयने त्याला भारतीय ‘अ’ संघाचा कर्णधार बनवले आहे.
ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्धचे दोन अनधिकृत कसोटी सामने लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. पहिला सामना 16 ते 19 सप्टेंबर 2025 दरम्यान होईल, तर दुसरा सामना 23 ते 26 सप्टेंबर 2025 दरम्यान त्याच स्टेडियमवर खेळवला जाईल. श्रेयस अय्यर हा बंगळुरूमध्ये सेंट्रल झोनविरुद्ध दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पश्चिम झोनच्या संघाचा भाग आहे. इंग्लंडविरुद्ध ओव्हल येथे पाचवा कसोटी सामना खेळणारा यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलला संघाचा उपकर्णधार नियुक्त करण्यात आले आहे.
या खेळाडूंना संघात मिळाले स्थान –
🚨 NEWS 🚨
India A squad for two multi-day matches against Australia A announced.
Details 🔽 #TeamIndiahttps://t.co/PJI6lWxeEQ pic.twitter.com/2gqZogQKnN
— BCCI (@BCCI) September 6, 2025
या संघात नारायण जगदीशन, अभिमन्यु ईश्वरन यांसारख्या देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. तसेच प्रसिद्ध कृष्णा यालाही संघात समाविष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, आयुष बडोनी याला दुलीप ट्रॉफीमधील उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस म्हणून संघात स्थान मिळाले आहे.
हेही वाचा – BCCI Elections : बीसीसीआयच्या निवडणुकीची तारीख जाहीर! जाणून घ्या किती पदांसाठी होणार निवडणूक?
दुखापतग्रस्त खेळाडू नितीश कुमार रेड्डी यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर बीसीसीआयने कळवले आहे की, केएल राहुल आणि मोहम्मद सिराज यांना दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यासाठी संघात समाविष्ट केले जाईल. हे दोन खेळाडू पहिल्या सामन्यानंतर दोन खेळाडूंच्या जागी संघात सामील होतील.
अनधिकृत कसोटी सामन्यांनंतर तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी भारतीय ‘अ’ संघाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना 30 सप्टेंबर 2025 रोजी होईल, दुसरा सामना 3 ऑक्टोबर 2025 रोजी आणि तिसरा व अंतिम सामना 5 ऑक्टोबर 2025 रोजी खेळवला जाईल. एकदिवसीय मालिकेतील सर्व तीन सामने कानपूर येथे खेळवले जाणार आहेत.
हेही वाचा – BCCI Elections : बीसीसीआयच्या निवडणुकीची तारीख जाहीर! जाणून घ्या किती पदांसाठी होणार निवडणूक?
ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध भारतीय ‘अ’ संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिमन्यु ईश्वरन, एन. जगदीसन (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, हर्ष दुबे, आयुष बडोनी, नितीश कुमार रेड्डी, तनुष कोटियन, प्रसिध कृष्णा, गुरनूर बरार, खलील अहमद, मानव सुथार, यश ठाकुर.





