IND vs NZ ODI Series 2024 : भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेचे वेळापत्रक जाहीर, सर्व सामने होणार अहमदाबादमध्ये…

INDW vs NZW ODI Series 2024 Schedule : भारतीय महिला संघ आणि न्यूझीलंड महिला संघ यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. बीसीसीआय (BCCI) ने सोमवारी भारत विरूध्द न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले असून ही मालिका 24 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.
🚨 NEWS 🚨
Fixtures for Team India (Senior Women)’s ODI series against New Zealand announced.
Details 🔽 #TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBankhttps://t.co/6FMzy6nuBk
— BCCI Women (@BCCIWomen) October 14, 2024
सध्या भारतीय महिला संघ आणि न्यूझीलंड महिला संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये टी-20 विश्वचषक खेळत आहेत. टी-20 विश्वचषकानंतर दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. याआधी टी-20 विश्वचषकात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा न्यूझीलंडकडून 58 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला होता. आता दोन्ही संघ भारतीय भूमीवर एकदिवसीय मालिकेत आमनेसामने येणार आहेत.
भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेतील पहिला सामना 24 ऑक्टोबरला तर दुसरा सामना 27 ऑक्टोबरला असेल. तर मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना 29 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. तसेच भारत-न्यूझीलंड मालिकेतील हे तिन्ही वनडे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच खेळवले जातील. तिन्ही सामने हे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होतील.
दरम्यान, यापूर्वी न्यूझीलंडचा महिला संघ 2022 मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेली होती. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ही मालिका 4-1 अशी जिंकली होती.





