Shahid Afridi : ‘और कितना गिरोगे…’, पहलगाम हल्ल्यावर आफ्रिदीच्या वक्तव्याला धवनचे चोख प्रत्युत्तर

Shikhar Dhawan Slams Shahid Afridi Over Pahalgam Attack Remarks : पहलगाम हल्ल्यावरील शाहिद आफ्रिदीच्या विधानावर माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने टीका केली आहे. शिखर धवन म्हणाला की, ‘पहले ही इतना गिरे हुए हो, और कितना गिरोगे’. कारण समा टीव्हीवर बोलताना शाहिद आफ्रिदीने भारतीय सैन्यावर प्रश्न उपस्थित केले आणि भारतावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे शिखर धवनने शाहिद आफ्रिदीला त्याच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिले.
देशाच्या प्रगतीसाठी डोकं लावा –
शाहिद आफ्रिदीच्या वादग्रस्त विधानाला प्रत्युत्तर देताना शिखर धवनने एक्सवर एक पोस्ट केलीय. ज्यामध्ये लिहिले की, “कारगिलमध्येही पराभव केला होता. अगोदरच इतकी नाचक्की झाली आहे आणखी किती करुन घेणार आहात?अनावश्यक बेताल वक्तव्य करण्याऐवजी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी डोकं लावलं तर चांगलं होईल. कारण आम्हाला आमच्या भारतीय सैन्याचा खूप अभिमान आहे. भारत माता की जय, जय हिंद.”
Kargil mein bhi haraya tha, already itna gire hue ho aur kitna giroge, bewajah comments pass karne se acha hai apne desh ki taraqqi mai dimag lagao @SAfridiOfficial. Humein hamari Indian Army par bohot garv hai. Bharat Mata Ki Jai! Jai Hind!https://t.co/5PVA34CNSe
— Shikhar Dhawan (@SDhawan25) April 28, 2025
शाहिद आफ्रिदी काय म्हणाला होता?
View this post on Instagram
Chouro jeet haar ko , aao tumhey chae pilata hun Shikhar . #FantasticTea https://t.co/ilEOepsVm0 pic.twitter.com/T45O8o2XUR
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) April 29, 2025
शाहिद आफ्रिदी पाकिस्तानी वृत्तवाहिनी समा टीव्हीवर म्हणाला होती की, ‘भारतात एक जरी फटाका फुटला, तर तेथील लोकं पाकिस्तानला दोष देतात. पहलगाममध्ये, दहशतवादी तासभर लोकांना मारत होते, त्यावेळी ८ लाखांपैकी एकही भारतीय सैनिक आला नाही. पण जेव्हा ते नंतर आले, तेव्हा त्यांनी १० मिनिटांतच या हल्ल्यासाठी पाकिस्तानला दोष द्यायला सुरुवात केली.’ यासह शाहिद आफ्रिदीने भारतावर स्वतःच्या लोकांना मारण्याचा आणि नंतर पाकिस्तानवर आरोप करण्याचा आरोपही केला होता. ज्यावर शिखर धवनने चोख प्रत्युत्तर दिले.
हेही वाचा – DC vs KKR : कुलदीपने रिंकूच्या कानशिलात मारल्यानंतर DC आणि KKR चा मोठा खुलासा, पाहा VIDEO
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने कारवाई करत भारतातील सर्व माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. यामध्ये शोएब अख्तर, बासित अली, रशीद लतीफ आणि कामरान अकमल यांची नावे आहेत. शिखर धवनने २४ ऑगस्ट २०२४ रोजी शिखर धवनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. धवनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २८८ डावांमध्ये १०,८६७ धावा केल्या आहेत. तो २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारताच्या संघाचा सदस्य होता.





