रितेशने जिनिलीयाला खास दिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा; म्हणाला “…और जिने को क्या चाहिए”

Ritesh Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख हे बॉलीवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक आहे. नुकताच रितेश आणि जिनिलीयाने त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे. रितेशने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर जिनिलीयासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. यावर अनेकांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रितेश-जिनिलीया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक गमतीशीर व्हिडिओ शेअर करत ते चाहत्यांचे मनोरंजन करतात. रितेशने लाडक्या बायकोसाठी रोमँटिक पोस्ट शेअर करत तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितेशने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन जिनिलीयासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. “जेव्हा तुमचं जग तुमच्या हातात सामावतं…और जिने को क्या चाहिए. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको,” असं रितेशने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
View this post on Instagram
रितेशच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनीही त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता बॉबी देओलनेही रितेश “हॅपी अॅनिव्हर्सरी” म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, तब्बल १० वर्षे एकमेकांना डेट केल्यावर या दोघांनी ३ फेब्रुवारी २०१२ रोजी थाटामाटात लग्न केलं. आज यांच्या सुखी वैवाहिक आयुष्याला तब्बल १२ वर्षे पूर्ण झालेली आहेत.





