Suresh Dhas : ‘तुमचा आशीर्वाद राहू द्या, शंभर टक्के आहे…’ सुरेश धस आणि सतीश भोसलेची ऑडिओ क्लिप व्हायरल

जालना : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या शिरूरमधील एक धक्कादायक व्हिडीओ समोर अल्ला आहे. यामध्ये आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले एका व्यक्तीला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. एक अर्धनग्न अवस्थेतील व्यक्तीला एकाने व्यक्तीने पकडलं आहे आणि दुसरा व्यक्ती बॅटने त्याला मारतोय… बॅटने मारणारा हा व्यक्ती संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना घेरणाऱ्या आमदार सुरेश धस यांच्या जवळचा कार्यकर्ता आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सतीश भोसलेसोबत बोलतानाची सुरेश धस यांची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.
ऑडिओ क्लिपमधील संवाद काय?
सुरेश धस- हा खोक्या
सतीश भोसले – हा… बोला ना
सुरेश धस – हॅलो, सॉरी अरे बाबा मला गडबडीत जमलं नाही, शुभेच्छा द्यायला.
सतीश भोसले – बोला ना, बोला ना.
सुरेश धस – काही नाही. वाढदिवसाच्या बीलेटेट शुभेच्छा.
सतीश भोसले – धन्यवाद. धन्यवाद. तुमचा आशीर्वाद राहू द्या फक्त असाच.
सुरेश धस – शंभर टक्के आहे. काय? 99 टक्के सुद्धा नाही. शंभर आहे…
सतीश भोसले – (हसत) ओके बॉस. ओके बॉस. धन्यवाद बॉस.
असे संभाषण आमदार सुरेश धस आणि सतीश भोसले यांच्यात झालेले आहे. दरम्यान, सतीश भोसले याचे इतरही अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. यापैकीच एका व्हिडीओमध्ये सतीश भोसले कारमध्ये चालकाच्या बाजूच्या आसनावर बसलेला आहे आणि नोटांचे बंडल दाखवत आहे. त्याचबरोबर आणखी एक व्हिडीओ आहे, त्यातही सतीश भोसले हा नोटांची बंडल दाखवत आहे.
सतीश भोसलेवर कारवाई झाली पाहिजे : सुरेश धस
सतीश भोसलेला मी ओळखतो. तो कधी कधी माझ्याकडे येतो. पण तो पाठिमागे असे काही उद्योग करतो हे थोडीच मला माहिती आहे, असं आमदार सुरेश धस यांनी आज पत्रकारांशी बोलताना म्हंटलं आहे. तसेच शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी अगोदर हे सांगू इच्छितो की, हा व्हायरल होणारा व्हिडीओ आताचा नाही तर दीड वर्षे जुना आहे. तो बॉस समजतो म्हणून काय झाले. मीच बॉस सांगतो त्याच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे असं सुरेश धस यांनी म्हटले आहे.
कोण आहे सतीश भोसले?
सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे. शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील तो रहिवासी आहे. भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद सतीश भोसलेकडे आहे. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण करून त्याने पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले. याआधीही सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
अलीकडच्या काळात भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याशी त्याचा संपर्क झाला. यानंतर सतीश भोसले आणि सुरेश धस यांची जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने त्याचा परिसरात दबदबा झाला. गेल्या 24 तासात सतीश भोसले यांचे विविध व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सतीश भोसले याची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा रंगली आहे.
सुरेश धस यांचा गुंड सतीश भोसले उर्फ खोख्या उर्फ पार्टी याचा माज बघा …
एवढे पैसे कुठून आले? हा व्हिडिओ विधानसभा निवडणुक काळातील आहे. याला पैसे पुरवणारे कोण? याला लोकांना मारण्यासाठी ठेवलाय? एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यावरच आपण यावर बोलणार का?@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks pic.twitter.com/OZ1TRtJ38p
— कृष्णा (@lamb_krushna) March 5, 2025





