Maharashtra Politics : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात भाजपच्या महिला पदाधिकारी आशा बुचके (Maharashtra Politics) यांच्यावर गंभीर आरोप समोर आला आहे. एका युवकाला पैशासाठी धमकावल्याचा आणि जबरदस्तीने चेक घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून, या प्रकरणातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. युवक रोशन बिरमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये त्यांना बोलावण्यात आले. तेथे आशा बुचके (Maharashtra Politics) यांनी पैशासाठी जबरदस्ती केली आणि पैसे दिले नाहीत तर “उभा चिरून टाकीन, जीभ हसडून टाकेन” अशा अत्यंत धमकीच्या भाषेत बोलल्याचा आरोप आहे. ऑडिओ क्लिपमध्ये ही भाषा स्पष्ट ऐकू येत असल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. जबरदस्तीने चेक घेतल्याचा आरोप रोशन बिरमल यांनी सांगितले की, सरकारी गेस्ट हाऊसमध्ये बोलावून त्यांच्याकडून जबरदस्तीने चेक घेण्यात आला. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी त्यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. “लोकप्रतिनिधी की टोळीचा वसुली एजंट?” असा प्रश्न उपस्थित करत रोशन बिरमल यांनी या घटनेची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. भाजप आशा बुचके यांचा पूर्वीही वाद आशा बुचके यांच्यावर हा पहिला आरोप नाही. यापूर्वीही त्यांच्यावर विविध वाद आणि धक्काबुक्कीचे आरोप झाले आहेत. त्या आधी शिवसेनेत सक्रिय होत्या आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिवनेरी किल्ल्यावर एका कार्यक्रमादरम्यान (Maharashtra Politics) आशा बुचके यांनी आमदार सोनवणे यांच्या हातातील माईक हिसकावून घेतला होता. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना तात्काळ उभे करून स्वतः भाषण करण्यास सुरुवात केली होती. या घटनेनंतरही त्यांच्यावर टीका झाली होती.