‘मनी हाइस्ट’ या वेब सीरिजबाबत प्रेक्षकांमध्ये चांगलंच वेड

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जगभरात लॉकडाऊन असताना घरात बसलेल्यांसाठी ऑनलाईन मनोरंजन हे जास्त उपयोगी ठरत आहे. टीव्हीप्रमाणेच प्रेक्षक हे नेटफ्लिक्स, प्राईम टाईम, झी ५, अॅमेझॉन सारख्या अॅप्सवरील चित्रपट आणि वेबसीरिजलाही सर्वाधिक पसंती देत आहेत. यामध्ये नेटफ्लिक्सवर नुकतीच प्रदर्शित झालेली मनी हाइस्ट ही इंग्रजी वेबसीरिज सध्या सर्वाधिक लोकप्रिय ठरत असून गेल्या २० दिवसांत तब्बल ६ कोटींहून अधिक प्रेक्षकांनी ती पाहिल्याचे निदर्शनास आले आहे.
View this post on Instagram
मनी हाइस्ट या वेबसीरिजला लॉकडाऊनचा चांगलाच फायदा झाला आहे. भारतातील प्रेक्षकांमध्येही या सीरिजबाबत चांगलंच वेड ला मिळत आहे. त्यामुळेच की या वेबसीरिजने अवघ्या २० दिवसांत कोटींचा प्रेक्षकवर्ग मिळवला आहे. हॉलीवूड रिपोर्टल वेबसाइच्या मते, ३ एप्रिल रोजी ही सीरिज प्रदर्शित करण्यात आली होती. आतापर्यंत या वेबसीरिजला ६.५ कोटी लोकांनी पाहिले आहे.





