नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे. मोदींना मिळालेल्या 2700 भेटवस्तूचा लिलाव करण्यात येणार आहे. शनिवारपासून या भेटवस्तूंचा ऑनलाईन लिलाव करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या भेटवस्तूंची किंमत 200 रुपयांपासून सुरु होत आहे, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी दिली.
Continuing a practice I have always believed in!
All those gifts and mementos I have received in the last one year would be getting auctioned starting today till 3rd October. These mementoes would be on display at the NGMA near India Gate in Delhi.
Do visit to have a look! pic.twitter.com/vYRNvmjPQ1
— Narendra Modi (@narendramodi) September 14, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा www.pmmementos.gov.in या संकेतस्थळावर लिलाव करण्यात येणार आहे. या वस्तूंची किंमत 200 रुपयांपासून ते 2. लाख रुपयांपर्यंत आहे. या लिलावातून मिळणारी रक्कम केंद्र सरकारतर्फे गंगेच्या स्वच्छतेसाठी असलेल्या नमामी गंगे या मोहिमेच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे. दरम्यान, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या जवळपास 1800 भेटवस्तूंचा काही दिवसांपूर्वीच लिलाव करण्यात आला होता. आता पुन्हा भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे.