Pune Crime: “तु माझी नाही झाली तर, कोणाचीही होऊ शकत नाही’, एकतर्फी प्रेमातून घटस्फोटीत महिलेच्या खूनाचा प्रयत्न

पुणे – “तु माझी नाही झाली तर कोणाचीही होऊ शकत नाही’ असे म्हणत एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून घटस्फोटीत महिलेच्या खूनाचा प्रयत्न केला. महिलेला रस्त्यात गाठत तीच्यावर लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाली आहे. तीच्यावर खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. जखमी महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार संकेत शहाजी म्हस्के( रा.संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) याच्यावर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पिडीत महिलेचा 2006 मध्ये विवाह झाला होता. यानंतर तीचा 2018 मध्ये घटस्फोट झाला. यानंतरच तीची आरोपी संकेत म्हस्केसह दोघांबरोबर मैत्री झाली. दरम्यान तीचा पती पुन्हा तीच्या संपर्कात आला. तीने तशी कल्पना तीच्या दोन्ही मित्रांना दिली होती. तरीही संकेत म्हस्के मागील महिणाभरापासून पिडीतेच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता.
यानंतर तीने तीचा नंबर ब्लॉक करुन त्याला टाळण्याचा प्रयत्न केला. पिडीता बुधवारी बर्निंग घाट परिसरात रिक्षातून उतरली असता अचानक संकेतने येऊन तीला पकडले. “तु मला भेटत का नाही? माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु माझी नाही झाली, तर कोणाचीही होऊ शकत नाही’ असे म्हणत लाकडी दांडक्याने तीच्या हातावर मारले. ती खाली पडली असता, तीच्या डोक्यावर दांडक्याने वार केले. तीचा दुसरा मित्र तेथे पळत आला असता आरोपी संकेत म्हस्के हा तेथून पळून गेला.





