Pune News : महर्षीनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाचे घर बळकावण्याचा प्रयत्न; पोलीस आयुक्त अॅक्शन मोडवर
Updated On:

पुणे : स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महर्षीनगर पोलिस चौकी परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाच्या घराच्या जागेवर बळकावण्याच्या उद्देशाने काहीजणांनी कंपाउंड वॉल तोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तत्काळ लक्ष घालून संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर सदर ठिकाणी तोडण्यात आलेली कंपाउंड वॉल पुन्हा बांधून देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीवरून स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींचा शोध सुरू आहे.





