“रेड टाकून मला अटक करण्याचा प्रयत्न…”; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

Anil Deshmuk Vs Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यातच आता अनिल देशमुख यांनी एक पोस्ट शेअर करत देवेंद्र फडणवीस माझ्या अटकेची वाट पाहत असल्याचेही म्हटले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडवण्यात आल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी अनिल देशमुख यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, “देवेंद्र फडणवीस यांनी 4 वर्षापूर्वीची घटना उकरुण काढीत माझ्या विरुध्द दिल्लीच्या मदतीने CBI FIR दाखल केली आहे. 4 वर्षापुर्वी मी गृहमंत्री असतांना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीश महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा माझ्यावर आरोप आहे. माझ्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकुन मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत.”
देवेंद्र फडणवीस यांनी 4 वर्षा पुर्वीची घटना उकरुण काढीत माझ्या विरुध्द दिल्लीच्या मदतीने CBI FIR दाखल केली आहे.
4 वर्षापुर्वी मी गृहमंत्री असतांना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीष महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा…— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 10, 2024
पुढे त्यांनी लिहीले की, “ज्या देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीने ED-CBI ला हाताशी धरुन महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले त्यांना सांगू इच्छितो की, देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे,” असा थेट इशारा अनिल देशमुख यांनी दिला. Anil Deshmuk Vs Devendra Fadnavis |
काय आहे प्रकरण?
गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकार असताना त्यांना मोक्का अंतर्गत अटक करण्यासाठी अनिल देशमुख यांनी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप केला होता. याप्रकरणी सीबीआयकडून चौकशी करण्यात आली असून आता अनिल देशमुख यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Anil Deshmuk Vs Devendra Fadnavis |
हेही वाचा:
मुख्यमंत्री शिंदे ‘लाडक्या बहिणीं’च्या दारी; कुटुंब भेट मोहिमेला आजपासून सुरुवात





