Arunachal Pradesh and Sikkim Election 2024| देशातील लोकसभा निवडणूकीचे सात टप्प्यातील मतदान १ जून रोजी संपले. त्यानंतर आता ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकांसोबत अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये विधानसभा निवडणुकींसाठी मतदान पार पडले होते. त्यातील आज या दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. यात अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने मुसंडी मारल्याचे दिसत आहे. तर सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने आघाडी घेतली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपची आघाडी अरुणाचल प्रदेश विधानसभेमध्ये ६० जागांसाठी सत्ताधारी भाजपाने १० जागांवर आधीच बिनविरोध विजय मिळवला होता. यात मुख्यमंत्री पेमा खांडू यांचाही समावेश होता. तर आज होत असलेल्या ५० जागांवरील मतमोजणीमध्ये भाजपाने आतापर्यंत ३० जागांवर आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत भाजपच्या दरबारात सध्या ४० जागा दिसत आहेत. तर नॅशनल पीपल्स पार्टी ८ , राष्ट्रवादी तीन, काँग्रेस १ आणि अपक्ष २ जागांवर आघाडीवर आहेत. अरुणाचलमध्ये बहुमताचा आकडा ३१ आहे. तर २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने अरुणाचल प्रदेशात ४१ जागा जिंकल्या होत्या. जनता दल (युनायटेडने) सात, नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) पाच, काँग्रेस चार आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल एक जागा जिंकली. सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाची आघाडी Arunachal Pradesh and Sikkim Election 2024| तर दुसरीकडे, सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने आघाडी घेतली आहे. विधानसभेच्या ३२ जागा असलेल्या सिक्कीममध्ये ३० जागांसाठी मतमोजणी होत असून, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने २९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट पक्षाने एका जागेवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, १९ एप्रिल रोजी सिक्कीममध्ये ३२ विधानसभा जागांसाठी एकाचवेळी मतदान झाले. सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यात लढत झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीत एसकेएमने १७ जागा जिंकल्या होत्या, तर एसडीएफला १५ जागा मिळाल्या होत्या एक्झिट पोलनुसार राज्यात एसकेएम पुन्हा सत्तेत येणार असल्याची शक्यता आहे. Arunachal Pradesh and Sikkim Election 2024| हेही वाचा: मतमोजणीदिवशी शिरुर लोकसभा मतदार संघ मतमोजणी केंद्र परिसरात नो-पार्किंग झोन घोषित