मनसेच्या बॅनरची चर्चा,’ बर्फातला प्राणी बर्फात पाठवूया, संदीप वरळीत आणूया !’

Assembly Elections । राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांची सर्व राजकीय पक्ष करतांना दिसत आहे. अशातच मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध शिवसेना (उबाठा गट) असा सामना रंगताना दिसत आहे. वरळी येथे मनसेने लावलेले बॅनर्स सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.
या बॅनरवर आदित्य ठाकरे यांना विधानसभेत पाडण्याचा उल्लेख करण्यात आहे. मनसे कार्यकर्ते हर्षल खरात यांनी हे बॅनर लावले आहे.विधानसभेसाठी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंना जिंकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाचे वरळी विधानसभेती विद्यमान आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेतर्फे संदीप देशपांडे हे निवडणूक लढवण्याच्यी शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.
बॅनरवर लिहिण्यात आले आहे की, ‘बर्फातला प्राणी बर्फातच पाठवूया. जनमनातला आमदार, संदिप (देशपांडे) वरळीत आणूया. वरळीचे भावी आमदार (मनसे नेते) श्री. संदिप देशपांडे सन्माननिय राज ठाकरे यांचा विश्वासू शिलेदार.. विधानसभेत पाठवूया..’ असा संदेश या बॅनरववर लिहीण्यात आला आहे.






