Assembly Election 2024 : शिंदेंसाठी १० – १२ आणि पवारांसाठी ६ -८ मंत्रिपदे; भाजपने आपल्या मंत्र्यांची संख्या कमी केल्याची चर्चा

Maharashtra Assembly Election 2024 – काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राज्याच्या अतिकाळजीपोटी भाजपने नमते घेतले. आता ५ डिसेंबर रोजीच्या आझाद मैदान येथील नव्या सरकारचा शपथविधी करताना भाजपच्या २४ मंत्र्यांऐवजी १८ ते २१ मंत्रीच शपथ घेणार आहेत. ही मंत्रीसंख्या शिंदेंमुळेच घटल्याचे भाजप कार्यकर्त्यांना वाटते.
विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या जल्लोष यात्रा संपल्या.त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चार दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन त्यांचे आभार प्रकट केले. यादरम्यान अमित शहांनी तिन्ही नेत्यांचे म्हणणे ऐकून घेत. नव्या सरकारच्याबाबत तोडगा काढून मागितला.
तथापि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदें,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांची दुसऱ्या दिवशी होणारी बैठकच झाली नाही. तब्येत बरी नसल्याचे सांगत शिंदे साताऱ्याला गेले ते चार दिवस परतलेच नव्हते. काल ठाण्यात आल्यावर आमच्यात समन्वय आहे. आम्हाला लोकांनी दिलेल्या मतांचा सनमान करतो असे सांगत शिंदेंनी काही मूळ प्रश्नांची उत्तरे टाळली.
यादरम्यान, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देत शिंदेंच्या शिवसेनेची हवाच काढली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार व भाजपा काही करुन यावेळी मुख्यमंत्रिपद त्यागण्याच्या मूडमध्ये नसल्याचे समजताच कोंडी झालेल्या शिंदेंना भूमिका बदलावी लागून मुख्यमंत्रिपदाचा डेडलॉक संपल्याचेही पत्रकार परिषदेत आवर्जुन सांगावे लागले.
या पार्श्वभूमीवर शिंदे,भाजप व महायुतीच्या अन्य मित्रपक्षांचे सूर पुन्हा जुळले असे वाटत असतानाच शिंदे समर्थक शिवसेना आमदारांनी गृहमंत्रिपदाचा डेडलॉक असल्याचे सांगितले. शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारतो पण गृहखाते घेतल्याचा आभास निर्माण केला.
तर माजी मंत्री उदय सामंतांनी भाजपबरोबर वाटाघाटी सुरु आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपद शिदेंनाच मिळणार असा विश्वास व्यक्त केला. भरत गोगावले यांनी सर्व विषय शिंदेंवर सोपवत वाटाघाटी सुरुच आहेत पण शिंदें मुख्यमंत्री असताना फडणवीस उपमुख्यमंत्री होते सांगत १९९५ च्या युती सरकारपासूनचे संदर्भ दिले. शिवसेना नेत्यांच्या या अडेलतट्टू भूमिकेनंतर गृहखाते हे महत्वाचे असून भाजप स्वत:कडे ठेवणार असल्याचे कळताच शिंदे शिवसेनेने नगरविकास व महसूल खत्याचीही मागणी सुरु केली पण भाजपकडून त्यासही प्रतिसाद मिळत नाही.
उलट सागर बंगला व भाजप प्रदेश कार्यालयात जमलेल्या भाजप कार्यकर्त्यात नाराजीचा सूर उमटत असून व शिंदेंच्या नाराजी नाट्यामुळे १३७ संख्याबळ असलेल्या भाजपला तीन जागा कमी करुन नव्या सरकारच्या शपथविधी समारंभात तीन मंत्रीपद घटवावी लागली. आता भाजपला त्यांच्या कोट्यातील सध्या २१ मंत्रीपदांपैकी अठरा मंत्र्यांचाच शपथविधी उरकावा लागणार आहे. शिंदे शिवसेनेस आता १० ते बारा मंत्रीपद मिळतील तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सहा ते आठ मंत्री शपथ घेतील.





