Ranji Trophy 2025 : रणजी ट्रॉफीचा मोडला ६३ वर्षांचा जुना विक्रम! अवघ्या ५४० चेंडूत आटोपला सामना

रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात लहान सामना
या सामन्यात एकूण 540 चेंडूंचा खेळ झाला, ज्यामुळे हा सामना रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील चेंडूंच्या बाबतीत सर्वात लहान सामना ठरला. ज्यामुळे 1962 मध्ये रेल्वे आणि दिल्ली यांच्यातील 547 चेंडूंच्या सामन्याचा 63 वर्षांचा विक्रम मोडला. विशेष म्हणजे, रणजी ट्रॉफीच्या 91 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एकाच सामन्यात दोन वेगवेगळ्या गोलंदाजांनी हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम केला. सर्व्हिसेसच्या अर्जुन शर्मा आणि मोहित जांगरा यांनी ही कामगिरी केली.
A first in Ranji Trophy ☝
Arjun Sharma 🤝 Mohit Jangra
2️⃣ hat-tricks for Services in their game against Assam 👏
This was the first instance in Ranji Trophy history where two different bowlers claimed hat-tricks in the same innings 👌
Scorecard ▶️ https://t.co/serZLq3IXR… pic.twitter.com/FxeVcHMK1q
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 25, 2025
रियान परागची गोलंदाजीत कमाल
आसाम संघाचा खेळाडू रियान पराग याला फलंदाजीत विशेष कामगिरी करता आली नाही, परंतु गोलंदाजीत त्याने आपली छाप पाडली. रियानने सर्व्हिसेसच्या पहिल्या डावात 5 गडी, तर दुसऱ्या डावात 2 गडी बाद करत एकूण 7 गडी बाद केला.
पॉइंट्स टेबलमधील स्थिती –
या विजयासह सर्व्हिसेस संघाने एलिट ग्रुप-सीच्या पॉइंट्स टेबलमध्ये दोन सामन्यांत 13 गुणांसह पहिले स्थान पटकावले आहे, त्यांचा नेट रनरेट +0.710 आहे. दुसरीकडे, आसाम संघ दोन सामन्यांत केवळ एका गुणासह पाचव्या स्थानावर आहे.





