Sophie Devine Retirement : सोफी डिव्हाइनचा वनडे क्रिकेटला अलविदा! शेवटच्या सामन्यानंतर झाली भावूक, VIDEO व्हायरल

Sophie Devine Retirement from ODI : आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 मध्ये न्यूझीलंड महिला संघाला अपेक्षित यश मिळाले नाही. लीग टप्प्यात खेळलेल्या सात सामन्यांपैकी केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला, ज्यामुळे संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर राहिला. त्यांना लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध 8 गडी राखून एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. हा सामना न्यूझीलंडची कर्णधार आणि दिग्गज खेळाडू सोफी डिव्हाइनचा वनडेमधील अखेरचा सामना होता.
“मला विजयासह निरोप घ्यायचा होता” – सोफी डिव्हाइन
या पराभवासह तिला आपल्या कारकिर्दीला निरोप द्यावा लागला, आणि मैदान सोडताना ती भावूक झाल्याचे दिसून आले. सामना संपल्यानंतर सोफी डिव्हाइनने आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, “मी विजयासह निरोप घ्यायला इच्छुक होते, पण दुर्दैवाने ते शक्य झाले नाही. भावूक होण्याबाबत मी जितके विचार केले होते, तितके मी रडले नाही. निवृत्तीची घोषणा आधी केल्याचा फायदा असा झाला की, मी माझ्या भावनांना समजू शकले. आजचा दिवस मला आनंदाने जगता आला आणि 19 वर्षांपूर्वीच्या सुरुवातीच्या आठवणींना उजाळा देता आला.”
View this post on Instagram
सोफी डिव्हाइनला दिला गार्ड ऑफ ऑनर –
विशेष म्हणजे, सोफी डिव्हाइन न्यूझीलंडसाठी वनडेमध्ये सर्वाधिक काळ खेळणारी दुसरी महिला खेळाडू आहे. याबाबत तिच्यापुढे फक्त सुझी बेट्स आहे.न्यूझीलंड महिला संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केवळ 168 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडने हे लक्ष्य 29.2 षटकांत सहज गाठले. सामना संपल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी सोफी डिव्हाइनला तिच्या शानदार वनडे कारकिर्दीच्या सन्मानार्थ गार्ड ऑफ ऑनर दिले आणि शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा – Rohit Sharma Post : ‘सिडनीला शेवटचा निरोप…’, रोहित शर्माची इमोशनल पोस्ट व्हायरल झाल्याने चाहते भावूक
सोफीच्या वनडे कारकिर्दीवर नजर टाकल्यास, तिने 159 सामन्यांमध्ये 32.66 च्या सरासरीने 4279 धावा केल्या, ज्यात 18 अर्धशतके आणि 9 शतके यांचा समावेश आहे. गोलंदाजीतही तिने 36.28 च्या सरासरीने 111 विकेट्स घेतल्या. सोफी डिव्हा इनच्या योगदानामुळे न्यूझीलंड क्रिकेटला एक नवी ओळख मिळाली, आणि तिच्या निवृत्तीने एका यशस्वी अध्यायाचा अंत झाला.





