Assam Assembly Elections 2026: आसामच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळाले. नागावचे लोकसभा खासदार प्रद्योत बोरदोलोई यांनी अधिकृतपणे काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि आसाम भाजपचे अध्यक्ष दिलीप सैकिया यांच्या उपस्थितीत बोरदोलोई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रद्योत यांच्यामुळे आसाम भाजप मजबूत होईल Assam Assembly Elections 2026: नागावचे लोकसभा खासदार प्रद्योत बोरदोलोई यांच्या भाजप प्रवेशावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री हिमंता यांनी, “नागावचे खासदार प्रद्योत बोरदोलोई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेससोबतचा त्यांचा संबंध १९७५ पासूनचा आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्ष मजबूत होईल. आम्ही सर्वजण त्यांचे पक्षात स्वागत करतो.”असे म्हटले. Assam Assembly Elections 2026: मुख्यमंत्री हिमंता म्हणाले, “आसाम राज्य भाजप केंद्रीय नेतृत्वाला शिफारस करेल की त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी. जर एखाद्या व्यक्तीमध्ये काँग्रेसमध्ये राहण्याचा आत्मसन्मान उरला नसेल, तर तिथे राहण्यात काही अर्थ नाही.” काँग्रेसच्या अधिक नेत्यांना पक्षात आणणे हे आमचे ध्येय आहे. प्रद्युत बोरदोलोई यांनी काल काँग्रेसमधील आपल्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना एक ओळीचे राजीनामा पत्र पाठवले. अवघ्या २४ तासांनंतर, ते भाजपमध्ये सामील झाले. समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पक्षप्रवेशात संपूर्ण आसाम भाजप टीमचा सहभाग होता. आसाम काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भाजपमध्ये सामील होणार Assam Assembly Elections 2026: आसाम काँग्रेसमध्ये प्रमुख नेत्यांच्या राजीनाम्यांची मालिका सुरूच आहे. माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योती तालुकदार यांनीही काँग्रेसमधून राजीनामा दिला आहे. दिल्लीत माध्यमांशी बोलताना नवज्योती तालुकदार म्हणाले, “मी आज आसामला जाऊन भाजपमध्ये सामील होणार आहे. आमचे खासदार प्रद्युत बोरदोलोई आज भाजपमध्ये सामील होत आहेत. आम्ही आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी बोललो आहोत.” त्यांनी असेही संकेत दिले की, प्रद्युत बोरदोलोई भाजपमध्ये सामील झाल्यानंतर काँग्रेसचे आणखी अनेक नेते पक्ष सोडू शकतात. नवज्योती तालुकदार हे आसाम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी राज्याचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.