Recurve Archery Gold : भारतीय महिला तिरंदाजांनी रिकर्व्ह प्रकारात जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक! दक्षिण कोरियाला चारली धूळ
Recurve Archery Gold : भारताच्या कुमकुम, अंकिता आणि कीर्ती यांनी २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीच्या रिकर्व्ह महिला सांघिक प्रकारात १० वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या दक्षिण कोरियाचा पराभव करून या प्रकारात प्रथमच सुवर्णपदक जिंकले.

Asian Games 2026 Womens Recurve Archery India Beats South Korea Historic Gold : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या महिला तिरंदाजी संघाने जागतिक क्रीडाविश्वात नवा इतिहास रचला आहे. महिलांच्या रिकर्व्ह सांघिक प्रकाराच्या (Women’s Recurve Team Event) सुवर्णपदकाच्या लढतीत भारताने १० वेळा ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणाऱ्या बलाढ्य दक्षिण कोरियाचा ५-३ असा पराभव करत पहिल्यांदाच सुवर्णपदक (Gold Medal) आपल्या नावावर केले. भारताच्या कुमकुम मोहड, अंकिता भकत आणि कीर्ती या त्रिकुटाने या ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
सुरुवातीच्या दोन सेट्समध्ये कडवी झुंज; बरोबरीने वाढवला रोमांच!
उपांत्य फेरीत बलाढ्य चीनचा पराभव करून अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारतीय महिला संघासमोर जगातील अव्वल मानल्या जाणाऱ्या दक्षिण कोरियाचे तगडे आव्हान होते. मात्र, भारतीय खेळाडूंनी पहिल्या क्षणापासूनच अचूक नेम साधत कोरियाला निष्प्रभ केले. पहिला सेट ५४-५४ असा बरोबरीत सुटला, तर दुसऱ्या सेटमध्येही दोन्ही संघांनी ५६-५६ अशी बरोबरी साधल्याने लढत अत्यंत चुरशीची झाली.
तिसऱ्या सेटमध्ये कोरियन खेळाडूंचा तोल ढळला; भारताची ४-२ ने आघाडी!
HUGE WIN FOR TEAM INDIA 🇮🇳💥
India’s Women’s Recurve Team Won The Gold Medal By Defeating South Korea 5-3 In The Final . Earlier In The Semifinals , India Had Defeated WR 1 China With A Score Of 5-1 .
Congrats To Kumkum , Ankita & Kirti ❤️#AsianGames2026 #Archery https://t.co/xIxg5aZHg3 pic.twitter.com/CwAq8rwV9Q
— Badminton Media (@BadmintonMedia1) October 2, 2026
सामन्याचा तिसरा सेट निर्णायक ठरला. कोरियन संघातील कांग चेयोंग, ओ येजिन आणि ली युनजी या अनुभवी खेळाडूंच्या खराब कामगिरीचा भारताने पुरेपूर फायदा उठवला. कुमकुम, अंकिता आणि कीर्ती यांनी ५५ गुण मिळवत हा सेट ५५-५२ अशा फरकाने जिंकला आणि सामन्यात ४-२ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
चौथ्या सेटमध्ये बरोबरी साधत ५-३ ने सामना खिशात; ऐतिहासिक सुवर्ण वेध!
🇮🇳🏹🥇 ARCHERY HISTORY CREATED IN AICHI-NAGOYA (Women’s recurve team)
Ankita Bhakat, Kirti Sharma, and Kumkum Mohod win Gold Medal against the 10-time Olympic champions South Korea in 5-3 at the 2026 Asian Games!#AsianGames #Archery #AsianGames2026
pic.twitter.com/2Ge2eEucjE— Vikas Kohli (@imvikaskohli) October 2, 2026
चौथ्या सेटमध्ये दक्षिण कोरियाने ५४ गुण मिळवून पुनरागमनाचा प्रयत्न केला. भारताला सुवर्णपदक निश्चित करण्यासाठी हा सेट किमान बरोबरीत सोडवणे आवश्यक होते. भारतीय त्रिकुटाने प्रचंड दबावाखालीही अचूक लक्ष्य साधत चौथा सेट बरोबरीत सोडवला आणि सामना ५-३ अशा फरकाने जिंकून रिकर्व्ह तिरंदाजीत भारताला पहिल्या ऐतिहासिक सुवर्णपदकाचा मुकुट चढवला.





