Tajinderpal Toor Silver : अवघ्या १७ सेंटीमीटरने हुकली ‘गोल्डन हॅटट्रिक’! तजिंदरपाल सिंग तूरने जिंकले रौप्य; सुवर्णपदकाचा थरार एका थ्रोने फिरवला
Tajinderpal Toor Silver : भारताचा स्टार गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूर २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाच्या हॅटट्रिकपासून वंचित राहिला.

Asian Games 2026 Tajinderpal Singh Toor Wins Silver In Shot Put Misses Golden Hattrick : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताचा स्टार गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूरची (Tajinderpal Singh Toor) ऐतिहासिक ‘गोल्डन हॅटट्रिक’ अवघ्या काही सेंटीमीटरच्या फरकाने हुकली आहे. पुरुषांच्या शॉट पुट (गोळाफेक) प्रकारात तजिंदरपालने २०.६४ मीटर लांब गोळा फेकत रौप्यपदक (Silver Medal) पटकावले. इराणच्या मोहम्मद रझा तैयबीने २०.८१ मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकून तूरला मागे टाकले. परिणामी, अवघ्या ०.१७ मीटर म्हणजेच १७ सेंटीमीटरच्या फरकामुळे भारताचे खात्रीशीर सुवर्णपदक निसटले.
पाचव्या प्रयत्नात साधली रौप्यपदकावर झेप; अखेरचा थ्रो ठरला फाऊल!
अंतिम फेरीत तूरने पहिल्या प्रयत्नात २०.०६ मीटर, दुसऱ्या प्रयत्नात २०.२६ मीटर गोळा फेकला. त्यानंतर तिसऱ्या (१९.७७ मीटर) आणि चौथ्या (१९.७१ मीटर) प्रयत्नात त्याची कामगिरी काहीशी खालावल्याने तो कांस्यपदकाच्या स्थितीत पोहोचला होता. मात्र, पाचव्या प्रयत्नात सर्व शक्ती एकवटून त्याने २०.६४ मीटरचा थ्रो नोंदवत थेट रौप्यपदकावर दावा ठोकला. सुवर्ण जिंकण्यासाठी अखेरच्या प्रयत्नात मोठी उसळी घेण्याचा त्याचा प्रयत्न फाऊल ठरला. या प्रकारात सौदी अरेबियाच्या मोहम्मद तोलूने २०.४८ मीटरसह कांस्य जिंकले.
२०१८ आणि २०२२ चे सुवर्णविजेतेपद; सलग तिसरे आशियाई पदक!
REDEMPTION FOR TOOR!
Tajinderpal Singh Toor fights back to win Asian Games SILVER with a best throw of 20.64m.
Down in third after Round 4, he delivered when it mattered most — 20.64m in Round 5 to climb onto the podium.
Just 17cm off GOLD.
And now: THREE STRAIGHT ASIAN GAMES…
— nnis Sports|Asian GamesAthletics (@nnis_sports) September 26, 2026
३२ वर्षीय तजिंदरपालने २०१८ च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत २०.७५ मीटर, तर २०२२ च्या हांगझोऊ आशियाई स्पर्धेत २०.३६ मीटर थ्रो करत सुवर्णपदक जिंकले होते. नागोयात मिळवलेल्या या रौप्यपदकासह आशियाडच्या इतिहासातील हे त्याचे सलग तिसरे वैयक्तिक पदक ठरले आहे. सलग तीन सुवर्ण जिंकून नवा जागतिक विक्रम रचण्याचे त्याचे स्वप्न अधुरे राहिले असले, तरी त्याचे हे सातत्य उल्लेखनीय ठरले.
आता २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकवर असणार लक्ष्य!
Congratulations to Tajinderpal Singh Toor on winning Silver in Men’s Shot Put at Asian Games 2026 and securing his third consecutive Asian Games medal.#Cheer4Bharat pic.twitter.com/NoKRKMZn7f
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) September 26, 2026
आशियाई स्तरावर सलग तीन पदके जिंकणाऱ्या तजिंदरपालला ऑलिम्पिक स्पर्धेत आजवर लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. त्यामुळे आशियाडमधील या रौप्यपदकानंतर आता त्याचे संपूर्ण लक्ष २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकवर केंद्रित असेल. ऑलिम्पिक पदकाचा प्रदीर्घ दुष्काळ संपवण्यासाठी आतापासूनच कठोर सराव करण्याचा त्याचा मानस आहे.





