Joshna Velavan Bronze : विजयाचा जल्लोष अंगाशी आला अन् हातातून सुवर्ण निसटले! जोशना-वेलवन जोडीला कांस्यवर मानावे लागले समाधान
Joshna Velavan Bronze : जोशना चिनप्पा आणि वेलवन सेंथिलकुमार स्क्वॉशच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या अगदी जवळ आले होते, पण एका रोमांचक उपांत्य फेरीत त्यांना हाँगकाँगच्या टँग मिंग हॉंग आणि ली का यी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.

Asian Games 2026 Squash Mixed Doubles Joshna Velavan Win Bronze Medal Controversial Semifinal Loss : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली असली, तरी सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने भारतीय गोटात मोठी निराशा पसरली आहे. स्क्वॉशच्या मिश्र दुहेरी (Mixed Doubles) प्रकारात भारताची स्टार जोडी जोशना चिनप्पा आणि वेलवन सेंथिलकुमार यांना उपांत्य फेरीत हाँगकाँगच्या टांग मिंग होंग आणि ली का यी या जोडीविरुद्ध १-२ (१०-११, ११-२, १०-११) असा अत्यंत चुरशीचा पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर (Bronze Medal) समाधान मानावे लागले.
पहिला गेम निसटला, दुसऱ्या गेममध्ये ११-२ ने वादळी कमबॅक!
उपांत्य फेरीच्या पहिल्या गेममध्ये दोन्ही संघांत तोडीस तोड लढत झाली; मात्र हाँगकाँगने अखेरच्या क्षणी बाजी मारत ११-१० असा गेम जिंकला. या पिछाडीनंतर भारतीय जोडीने दुसऱ्या गेममध्ये झंझावाती पुनरागमन केले. जोशना आणि वेलवनने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत ३-० आणि नंतर ७-२ अशी भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर प्रतिस्पर्ध्यांना एकही गुण न देता ११-२ अशा एकतर्फी फरकाने दुसरा गेम जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.
निर्णायक गेममध्ये ३ मॅच पॉईंट्स हुकले; हाँगकाँगची जबरदस्त झुंज!
Congratulations to @joshnachinappa and Velavan Senthilkumar on winning the Bronze medal in the Squash Mixed Team event at the Asian Games. Their skill and determination are exceptional.
For Joshna, it is her consecutive Asian Games appearances and a medal at every edition since… pic.twitter.com/g2xFHOSRAq
— PMO India (@PMOIndia) September 26, 2026
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये कमालीचा थरार पाहायला मिळाला. सुरुवातीला २-५ ने पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय जोडीने संयमी खेळ करत स्कोर ६-६ असा बरोबरीत आणला. वेलवनच्या उत्कृष्ट बचावाच्या जोरावर भारताने ९-७ अशी आघाडी घेतली. या टप्प्यावर भारताकडे तब्बल तीन मॅच पॉईंट्स होते. मात्र, हाँगकाँगच्या जोडीने जबरदस्त संयम दाखवत सलग गुण मिळवले आणि सामना १०-१० असा बरोबरीत आणून सोडला.
अकाली जल्लोष अन् वादग्रस्त निर्णय; भारताचे सुवर्ण हुकले!
अखेरच्या पॉईंटसाठी झालेल्या अटीतटीच्या रॅलीमध्ये मोठा वाद निर्माण झाला. भारताने पॉईंट जिंकल्याचे समजून वेलवनने मैदानात क्षणभर जल्लोष केला. पंचांनी या हालचालीमुळे प्रतिस्पर्ध्याचे लक्ष विचलित झाल्याचे (Distraction) मानून भारताचा गुण अमान्य केला. त्यानंतर लगेचच हाँगकाँगने पुढील गुण पटकावत गेम ११-१० ने जिंकला आणि अंतिम फेरीत धडक मारली. विजयाच्या अतिउत्साहात भारताच्या हातातून विजयाची संधी निसटली.





