Women Kabaddi Gold : भारताच्या लेकींनी कबड्डीत सुवर्णपदकावर कोरलं नाव! इराणवर ३७-३४ च्या फरकाने केली दणदणीत मात
Women Kabaddi Gold : भारतीय महिला कबड्डी संघाने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत एका रोमांचक सामन्यात इराणला ३७-३४ अशा फरकाने पराभूत करून सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला.

Asian Games 2026 India Women Kabaddi Team Wins Historic Gold Medal Beats Iran 37-34 : जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारतीय महिला कबड्डी संघाने नवा इतिहास रचला आहे. शनिवारी, २६ सप्टेंबर रोजी झालेल्या अत्यंत चुरशीच्या सुवर्णपदकाच्या लढतीत भारताने बलाढ्य इराणचा ३७-३४ असा पराभव करत सुवर्णपदकावर (Gold Medal) आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयासह चालू आशियाई स्पर्धेत भारताच्या खात्यात हे तिसरे सुवर्णपदक जमा झाले आहे. साखळी फेरीपासून ते थेट अंतिम फेरीपर्यंत भारतीय महिलांनी स्पर्धेत संपूर्ण वर्चस्व राखत अजेय राहण्याचा पराक्रम केला.
पहिल्या हाफमध्ये २२-१६ ची भक्कम आघाडी; ७-७ च्या बरोबरीनंतर सामन्याला कलाटणी!
सामन्याची सुरुवात अत्यंत अटीतटीची झाली आणि एका क्षणी दोन्ही संघ ७-७ अशा बरोबरीत होते. मात्र, त्यानंतर भारतीय खेळाडूंनी आक्रमक रणनीती अवलंबत खेळाचा वेग वाढवला. भारताने पहिल्या हाफमध्ये इराणला एकदा सर्वबाद (All Out) करत २२-१६ अशी ६ गुणांची भक्कम आघाडी मिळवली. उत्कृष्ट रेडिंग आणि भक्कम बचावाच्या जोरावर भारताने इराणवर सुरुवातीपासूनच मानसिक दबाव निर्माण करण्यात यश मिळवले होते.
दुसऱ्या हाफमध्ये इराणची जोरदार मुसंडी; भारताला केले ऑलआऊट!
GOLD FOR BHARAT!🥇🇮🇳
Heartiest congratulations to the Indian Women’s Kabaddi Team on successfully defending their Asian Games title, defeating Iran in a Gold Medal Match at the Asian Games 2026.#Cheer4Bharat pic.twitter.com/Nza2PDQyPb
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) September 26, 2026
दुसऱ्या हाफमध्ये इराणने जबरदस्त पुनरागमन करत सामन्यातील चुरस टोकाला नेली. त्यांनी उत्कृष्ट टॅकल करत भारतीय संघाला एकदा ऑलआऊट केले, ज्यामुळे गुणांमधील अंतर अवघ्या काही गुणांवर येऊन ठेपले. प्रेक्षकांचे श्वास रोखून धरणारा हा टप्पा भारतासाठी कसोटीचा ठरला; मात्र भारतीय खेळाडूंनी संयम सुटू न देता पुन्हा एकदा इराणला ऑलआऊट करत सामन्यावरचे नियंत्रण पुन्हा मिळवले.
अखेरच्या क्षणी ३७-३४ ने बाजी मारली; नागोयात फडकला तिरंगा!
The Indian Women’s Kabaddi team defends their crown in a thrilling 37-34 victory over Iran to secure Gold for the 4th time! 👑🔥
Watch the 20th Asian Games Aichi-Nagoya 2026, LIVE on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #AsianGames… pic.twitter.com/j4WoP9hYoX
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 26, 2026
शेवटच्या काही मिनिटांत दोन्ही बाजूंनी एकेका गुणासाठी जोरदार संघर्ष झाला. मात्र, निर्णायक क्षणी भारताने आपली ३ गुणांची आघाडी कायम राखत ३७-३४ अशा फरकाने सोनेरी विजय साकारला. गट फेरी आणि उपांत्य फेरीत नेपाळविरुद्ध एकतर्फी विजय मिळवणाऱ्या भारतीय महिला संघाने या विजयासह आशियातील कबड्डीवर आपले निर्विवाद अधिराज्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.





