Nitesh Wrestling Silver : नागोयाच्या आखाड्यात भारतीय पैलवानाने ६४ वर्षांनी रचला इतिहास! रौप्य जिंकत मारुती मानेंच्या विक्रमाशी केली बरोबरी
Nitesh Wrestling Silver : जपानमधील आयची-नागोया येथील आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत नितेश सिवाचने पुरुषांच्या ९७ किलो ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात रौप्य पदक जिंकले. ६४ वर्षांनंतर ग्रीको-रोमन कुस्तीमधील भारताचे हे पहिले रौप्य पदक आहे.

Asian Games 2026 Greco Roman Wrestling Nitesh Siwach Wins Silver 64 Years Record : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) च्या कुस्तीच्या आखाड्यात भारताचा युवा कुस्तीपटू नितेश सिवाचने (Nitesh Siwach) ऐतिहासिक कामगिरी करत रौप्यपदक (Silver Medal) पटकावले आहे. पुरुषांच्या ग्रीको-रोमन ९७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत नितेशला यजमान जपानच्या युरी नाकाझातोकडून ०-४ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. सुवर्णपदकाने हुलकावणी दिली असली, तरी तब्बल ६४ वर्षांनंतर (१९६२ नंतर) आशियाडच्या ग्रीको-रोमन प्रकारात अंतिम फेरी गाठणारा तो पहिलाच भारतीय पैलवान ठरला आहे.
जपानच्या नाकाझातोचा आक्रमक पवित्रा; नितेशला मिळाली पॅसिव्हिटी पेनल्टी!
अंतिम लढतीत स्थानिक प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर उतरलेल्या युरी नाकाझातोने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या फेरीत नितेशला पॅसिव्हिटीसाठी पेनल्टी गुण देण्यात आले, ज्यामुळे जपानी मल्लाने २-० अशी आघाडी घेत खाते उघडले. यानंतर नितेशने बचावात्मक पवित्रा घेत नाकाझातोचे हल्ले परतवून लावले आणि ब्रेकपर्यंत ही पिछाडी २ गुणांवरच रोखून ठेवली.
दुसऱ्या फेरीत नाकाझातोचे वर्चस्व; नितेशचा कडवा प्रतिकार!
A Historic Silver for Bharat! 🥈🇮🇳
Heartiest congratulations to Nitesh on securing the Silver Medal in the Men’s 97kg Greco-Roman Wrestling event at the #AsianGames2026!
With a remarkable display of strength, technique and determination, Nitesh has created history by becoming… pic.twitter.com/nCeimCnkhb
— sarveshsirspeaks (@sarveshforpune) October 1, 2026
दुसऱ्या फेरीत बरोबरी साधण्यासाठी नितेशला आक्रमक खेळ करणे गरजेचे होते; मात्र नाकाझातोने सामन्याची गती पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवली. त्याने नितेशला खाली पाडत आपली आघाडी ४-० अशी वाढवली आणि त्याला पिन करून सामना संपवण्याचा प्रयत्न केला. नितेशने झुंज देत स्वतःला पिन होण्यापासून वाचवले, परंतु नाकाझातोच्या भक्कम तंत्रामुळे त्याला गुण मिळवण्याची संधी मिळाली नाही आणि सामना ०-४ असा गमवावा लागला.
मारुती मानेंच्या ऐतिहासिक विक्रमाशी बरोबरी; उपांत्य फेरीत ९-० ने धुव्वा!
Sweat, blood and silver! 🥈
Nitesh Siwach – an Asian Games finalist, 64 years in the making. Remarkable! 🫡#TeamIIS #AsianGames #TeamIndia #JeetegaIndia #CraftingVictories 🇮🇳 pic.twitter.com/7gCxvxQcE5
— Inspire Institute of Sport (@IIS_Vijayanagar) October 1, 2026
या ऐतिहासिक प्रवासात नितेशने उपांत्यपूर्व फेरीत तुर्कमेनिस्तानच्या अमनबर्दी अगामामेडोव्हचा ७-१ ने, तर उपांत्य फेरीत मंगोलियाच्या गनबातारिन गनखुयागचा ९-० असा एकतर्फी धुव्वा उडवून फायनलचे तिकीट मिळवले होते. यापूर्वी १९६२ च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे महान मल्ल मारुती माने यांनी याच ९७ किलो ग्रीको-रोमन प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर तब्बल ६४ वर्षांनी हा पराक्रम करून नितेशने भारतीय कुस्तीच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.





