Lovlina Borgohain Gold : लव्हलिनाने स्वत:च्या वाढदिवशी भारताला दिलं ‘गोल्डन’ गिफ्ट! चीनच्या बॉक्सरला लोळवून जिंकले सुवर्णपदक
Lovlina Borgohain Gold : लव्हलिना बोरगोहेनने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ७५ किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या सामन्यात एका चिनी खेळाडूला पराभूत करून भारतासाठी बॉक्सिंगमधील पहिले सुवर्णपदक जिंकले.

Asian Games 2026 Lovlina Borgohain Wins Gold Medal In Boxing Defeats China : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) च्या बॉक्सिंग रिंगमध्ये भारताची स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनने (Lovlina Borgohain) सुवर्ण कामगिरी करत इतिहास रचला आहे. महिलांच्या ७५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत लव्हलिनाने चीनची अव्वल बॉक्सर बाओ झियी हिचा एकतर्फी धुव्वा उडवत सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले. आज २ ऑक्टोबर रोजी लव्हलिनाचा वाढदिवस असून, तिने आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच देशाला हे सुवर्णपदकाचे अनमोल गिफ्ट दिले आहे. मागील हांगझोऊ आशियाडमधील अंतिम फेरीतील पराभवाची सल तिने यंदा नागोयात सुवर्ण जिंकून दिमाखात भरून काढली.
पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये चिनी बॉक्सरला चकवले; २-० अशी भक्कम आघाडी!
अंतिम लढतीत चीनच्या बाओ झियीने सुरुवातीपासूनच अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, ऑलिम्पिक पदकविजेत्या लव्हलिनाने कमालीचा संयम आणि तंत्रशुद्ध बचावाचे दर्शन घडवले. योग्य वेळी अचूक ठोसे लगावत तिने पहिली फेरी ३-२ अशा फरकाने जिंकली. दुसऱ्या फेरीत दोन्ही बॉक्सरमध्ये चुरशीची लढत झाली, पण लव्हलिनाने आपल्या अनुभवाच्या जोरावर ही फेरी ४-१ ने जिंकून सामन्यात २-० अशी निर्विवाद आघाडी घेतली.
तिसऱ्या फेरीत ५-० ने उडवला धुव्वा; एकतर्फी विजयासह सुवर्ण वेध!
Lovlina Borgohain delivers a memorable performance to claim Gold in the Women’s 75kg boxing event at the #AsianGames2026.
With this victory, she becomes the first Indian to win Gold in this category at the Asian Games.
Congratulations, Lovlina, on a superb achievement!… pic.twitter.com/gLGeYfwasO
— Raksha Khadse (@khadseraksha) October 2, 2026
निर्णायक तिसऱ्या फेरीत लव्हलिनाने रिंगवर संपूर्ण नियंत्रण मिळवले. चिनी खेळाडूला आक्रमणाची कोणतीही संधी न देता लव्हलिनाने सलग पंचेसचा वर्षाव केला आणि तिसरी फेरी तब्बल ५-० अशी एकतर्फी खिशात घालत सामना दिमाखात जिंकला. नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२६ च्या अंतिम फेरीत लवलिनाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते; मात्र आशियाडमध्ये तिने सुवर्ण जिंकून तो हिशोब चुकता केला.
भारताच्या खात्यात १२ वे सुवर्ण; एकूण पदकांची संख्या ७० वर!
🥊 WHEN THERE’S BOXING, HOW CAN THE CROWD BE FAR BEHIND? 🇮🇳🔥
The ring belonged to Lovlina Borgohain, but the energy inside the venue belonged to everyone cheering for Bharat!
As Lovlina scripted history with a Gold Medal in the Women’s 75kg category at the Asian Games 2026,… pic.twitter.com/m8olVZsigg
— SAI Media (@Media_SAI) October 2, 2026
लव्हलिनाच्या या ऐतिहासिक सुवर्ण विजयानंतर आता सर्वांचे लक्ष महिला गटात परवीन आणि पुरुष गटात अंकुश यांच्या सुवर्णपदकाच्या लढतींकडे लागले आहे. या सुवर्णपदकासह भारताच्या खात्यातील एकूण पदकांची संख्या आता ७० वर पोहोचली असून, त्यात १२ सुवर्णपदकांचा समावेश झाला आहे.





