Asian Games 2026 : एकही चेंडू न खेळता बांगलादेश थेट सेमीफायनलमध्ये! भारताचा पहिला सामना कधी? जाणून घ्या
Asian Games 2026 : बांगलादेश महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.

Asian Games 2026 Womens Cricket Bangladesh Qualify For Semis Rain Washout : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मधील क्रिकेटच्या थराराला सुरुवात झाली आहे. महिला क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. बांगलादेश आणि चीन यांच्यातील पहिला उपांत्यपूर्व सामना मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला. मात्र, सामना रद्द झाल्यानंतरही बांगलादेश महिला संघाने थेट उपांत्य फेरीत (Semi-Final) धडक मारली आहे. आयसीसी क्रमवारीत बांगलादेशचा संघ चीनपेक्षा खूप पुढे असल्यामुळे नियमानुसार सरस क्रमवारीच्या जोरावर बांगलादेशला थेट सेमीफायनलचे तिकीट बहाल करण्यात आले.
पावसामुळे पाकिस्तान-थायलंड सामन्यावरही संकट; रँकिंग ठरणार गेमचेंजर!
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पावसाचा प्रभाव कायम राहिल्याने पाकिस्तान आणि थायलंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यावरही पावसाचे होते. मात्र, हा सामना पार पडला असून या सामन्यात पाकिस्तान संघाने थांयलंडवर ३ विकेट्सनी विजय मिळवला आहे. ज्यामुळे पाकिस्तानचा संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश पोहोचला.
भारतीय महिला संघ शुक्रवारी मैदानात; यजमान जपानशी रंगणार लढत!
Rain brought a premature end to the opener, sending Bangladesh through to the semis on higher seeding. Heartbreak for China ~ who bow out without getting the chance to face a ball. #AsianGames2026 #BANWvCHIW #ACC pic.twitter.com/ypcEdMZen0
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 17, 2026
भारतीय महिला क्रिकेट संघाचा पहिला उपांत्यपूर्व सामना शुक्रवारी, १८ सप्टेंबर रोजी यजमान जपानविरुद्ध खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता हा सामना सुरू होईल. त्याआधी सकाळी ५:३० वाजता मलेशिया आणि श्रीलंका यांच्यात लढत होईल. भारतीय महिला संघही थेट उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला असून, जर सामन्यादरम्यान पाऊस पडला, तरी उच्च क्रमवारीच्या बळावर टीम इंडिया थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
पुरुष संघाचे सामने २२ सप्टेंबरपासून; अफगाणिस्तान मालिकेनंतर होणार रवाना!
Pakistan edge past Thailand in a rain-curtailed contest, with Fatima Sana’s late surge powering them into the Semi-Final of #AsianGames2026 🔥#PAKWvTHAIW #ACC pic.twitter.com/ibhKZsqOoz
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 17, 2026
दुसऱ्या बाजूला, भारतीय पुरुष संघाच्या सामन्यांसाठी चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. दिल्लीत अफगाणिस्तानविरुद्धचा तिसरा टी-२० सामना खेळल्यानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जपानला रवाना होईल. भारतीय पुरुष संघ २२ सप्टेंबर रोजी जपानविरुद्ध पहिला सामना खेळेल, त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीचे सामने रंगतील.





