Asian Games 2023(weightlifting) : मीराबाई चानूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात…

हांगझोऊ :- मीराबाई चानूची आशियाई क्रीडा मोहीम दु:खदायकरित्या संपली. ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई अयशस्वी लिफ्टमुळे तिच्या पाठीवर पडल्याने तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. अन्यथा तिला महिलांच्या 117 किलो वजनी गटात किमान कांस्यपदक मिळाले असते.
निराशाजनक स्नॅच आउटिंगनंतर दबावाखाली आलेल्या चानूने 117 किलो क्लीन अँड जर्क लिफ्टसाठी सर्वस्व पणाला लावले होते. परंतु दोनदा ती च्लीन जर्क करण्यात अयशस्वी ठरली. तिच्या शेवटच्या प्रयत्नात ती तिच्या पाठीवर पडली आणि कोचिंग स्टाफने तिला वाहून नेले. चानूने एकूण 191 किलो (108 किलो आणि 83 किलो) वजन उचलून चौथ्या स्थानावर नाव कोरले.
चानूने 83 किलो स्नॅच लिफ्टने सुरक्षित सुरुवात केली होती. मात्र या विभागात तिची ही एकमेव अधिकृत लिफ्ट ठरली. त्यानंतर तिचे नियंत्रण सुटले. तिने तिचा 108 किलो वजनाचा प्रयत्न घाईघाईने केला आणि तो अपयशी ठरला.
टेबल टेनिसमधील आव्हान संपुष्टात..
राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती मनिका बत्रा हिने शनिवारी येथे आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला एकेरीच्या टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. मात्र, मनिका जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या यिदी वांगविरुद्ध 8-11, 12-10, 6-11, 4-11, 14-12, 5-11 अशी पराभूत झाली आणि तिच्या पराभवामुळे भारताच्या एकेरीच्या मोहिमेचा शेवट झाला.





