आशियाई विकास बॅंकेकडून पॅकेजची रक्कम तिप्पट वाढ
Updated On:

नवी दिल्ली : करोनाग्रस्त देशांना दिल्या जाणाऱ्या पॅकेजच्या रकमेमध्ये तिपटीने वाढ केली जाणार असल्याचे आशियाई विकास बॅंकेने सोमवारी सांगितले. ही रक्कम आता 20 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
मदतीचे अधिक वेगाने आणि अधिक सुसुत्रतेने वितरणाला मान्यताही दिली आहे.
विकसनशील सदस्य देशांना आशियाई विकास बॅंकेने 18 मार्च रोजी 5 अब्ज डॉलरचे पॅकेज जाहीर केले होते. त्यामध्ये आता 13.5 अब्ज डॉलरची वाढ करण्यात आली आहे. करोनाच्या साथीमुळे प्रभावित झालेल्या सूक्ष्म आर्थिक व्यवस्थांमधील नुकसान भरून काढण्यासाठी तसेच आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी हे पॅकेज दिले जाणार आहे. या 20 अब्ज डॉलरच्या पॅकेजमध्ये 2.5 अब्ज डॉलर सवलतीच्या दरात आणि अनुदानाच्या स्वरूपात दिले जाणार आहे.



