Asian Champions Trophy 2024 : गतविजेत्या भारताची विजयी सुरुवात, पहिल्या सामन्यात चीनचा केला दारूण पराभव…

Asian Champions Trophy 2024 (India vs China) : भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी यजमान चीनवर 3-0 असा शानदार विजय मिळवत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीला दमदार सुरुवात केली. भारताकडून सुखजित सिंग (14वे मिनिट), उत्तम सिंग (27वे मिनिट) आणि अभिषेक (32वे मिनिट) यांनी गोल केले तर चीनला एकही गोल करता आला नाही.
ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरे कांस्यपदक जिंकल्यानंतर या स्पर्धेत खेळण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने सुरुवातीला मिळालेल्या संधींचे पूरेपूर फायदा घेतला आणि बचावातही दमदार कामगिरी करत विजय मिळवला. सोमवारी पूल 1 मध्ये भारताचा दुसरा सामना (दूपारी 1.15 वा.) जपानशी होणार आहे.
Team India off to a perfect start here at Hulunbuir, Inner Mongolia in the Hero Asian Champions Trophy 2024 with a 3-0 win over the hosts China.
Sukhjeet Singh, Uttam Singh and Abhishek score for Team India.
Next up Japan🇯🇵 tomorrow at 1.15 PM (IST)#HeroACT2024 #IndvChn… pic.twitter.com/rh1Sc5MTZy
— Hockey India (@TheHockeyIndia) September 8, 2024
पहिल्या क्वार्टरच्या सुरुवातीला सुखजीतने भारताला आघाडी मिळवून दिली तर दुसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या तीन मिनिटांपूर्वी उत्तम सिंगने आघाडी दुप्पट करून पहिल्या हाफच्या शेवटी भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत अभिषेकने अप्रतिम रिव्हर्स हिटने गोल करत संघाची आघाडी आणखी मजबूत केली.
गतवर्षी भारताने घरच्या भूमीवर ही स्पर्धा जिंकली, त्यामुळे स्पर्धेच्या इतिहासात चार विजेतेपद पटकावणारा हा एकमेव संघ ठरला. अन्य सामन्यांमध्ये मलेशियाने पाकिस्तानला 2-2 असे बरोबरीत रोखले तर जपान आणि कोरियाने 5-5 अशी बरोबरी साधली.





