Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान आमनेसामने; ‘या’ देशांत होणार आशिया कपचे आयोजन

Asia Cup 2025 Updates : क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा भारत आणि पाकिस्तानच्या संघांचा सामना होतो, तेव्हा उत्साह आणि रोमांच शिगेला पोहोचतो. आता पुन्हा एकदा असाच थरार अनुभवायला मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका तणावपूर्ण संबंधांमुळे आता होत नाहीत, परंतु आयसीसी आणि एसीसी स्पर्धांमध्ये दोन्ही संघांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळते. आता पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
दुबई आणि अबुधाबीमध्ये होऊ शकते आयोजन-
यंदा आशिया कप 2025 स्पर्धेचे आयोजन होणार असल्याने दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झालेले नसले, तरी संभाव्य तारखा समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे दोन्ही संघ एकाच गटात असण्याची शक्यता आहे. यंदाच्या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. परंतु यापूर्वीच ठरले आहे की, पुढील काही वर्षे भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही आणि पाकिस्तानी संघही भारत दौऱ्यावर येणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळीही असेच घडले होते. आशिया कपबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु असे मानले जात आहे की, ही स्पर्धा दुबई आणि अबुधाबी येथे होऊ शकते.
5 ते 21 सप्टेंबरदरम्यान होऊ शकतो आशिया कप –
Asia Cup 2025 likely to be held from September 5 to 21. 🏏
📍 Host venues: Dubai and Abu Dhabi
👥 8 teams to participate in total
🧢 Teams: India, Pakistan, Sri Lanka, Bangladesh, Afghanistan, UAE, Oman & Hong Kong📸: ACC/X#oneturfnews #asiacup2025 #indvspak #cricket pic.twitter.com/kQdS93bXdP
— OneTurf News (@oneturf_news) July 24, 2025
यंदाचा आशिया कप टी-20 स्वरूपात खेळला जाईल. याचे कारण असे की, एशिया कप नेहमी त्या स्वरूपात खेळला जातो, ज्या स्वरूपात पुढील विश्वचषक स्पर्धा होणार असते. पुढील वर्षी, म्हणजेच 2026 मध्ये टी-20 विश्वचषक होणार आहे, त्यामुळे एशिया कपही टी-20 स्वरूपातच होईल. आशिया कपचे वेळापत्रक जाहीर होणे बाकी आहे, परंतु असे समजते की ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात होईल. म्हणजेच वेळ फारच कमी आहे. माध्यमांच्या अहवालांनुसार, आशिया कपचा पहिला सामना 5 सप्टेंबरला होऊ शकतो, तर अंतिम सामना 21 सप्टेंबरला खेळला जाईल. या कालावधीत सलग सामने होतील.
हेही वाचा – IND vs ENG : बीसीसीआयने ऋषभ पंतबद्दल दिली मोठी अपडेट, गरज पडल्यास तो फलंदाजी करेल पण…
आठ देशांचा असणार समावेश –
भारत आणि पाकिस्तानशिवाय श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, ओमान आणि हाँगकाँग हे देश या स्पर्धेत सहभागी होतील. मात्र सर्वांचे लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे असेल. असे मानले जाते की, सर्व काही निश्चित झाल्यास लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाईल. कदाचित याच आठवड्यात सर्व गोष्टी निश्चित होऊन घोषणा होऊ शकते. आता यासाठी किती वेळ लागेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.





