Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाकिस्तानला एकाच गटात मिळालं स्थान

Asia Cup 2025 Full Schedule Announce : आशिया क्रिकेट परिषदेने (एसीसी) आशिया कप २०२५ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत खेळवली जाईल. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. ही स्पर्धा टी-२० स्वरूपात खेळली जाईल. टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी ही स्पर्धा टी-२० स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत एकूण ८ संघांचा समावेश करण्यात आला आहे. दोन स्वतंत्र गटांमध्ये प्रत्येकी ४-४ संघ ठेवण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांना एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. गट अ मध्ये भारत, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि ओमान यांचा समावेश आहे. तर गट ब मध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगानिस्तान आणि हाँगकाँग या संघांचा समावेश आहे.
India vs Pakistan Showdown! Sep 14 in the Asia Cup 2025! Schedule Reveals #TheFaiziCricketShow #AsiaCup2025 #INDvsPAK pic.twitter.com/Yt2TDBEQvW
— The Faizi Diaries (@faizan8487) July 27, 2025
आशिया कप २०२५ ची सुरुवात ९ सप्टेंबरपासून होणार आहे. पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात खेळला जाईल. भारताचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी युएईविरुद्ध होईल. त्यानंतर भारतीय संघ १४ सप्टेंबर रोजी दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळेल. भारताचा पुढील सामना १९ सप्टेंबर रोजी ओमानविरुद्ध होणार आहे.
हेही वाचा – IND vs ENG : शुबमन गिलने मोडला मोहम्मद यूसुफचा विक्रम, इंग्लंडमध्ये रचला नवा इतिहास
आशिया चषक २०२५ मध्ये सहभागी संघ आणि सामने –
या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार आहेत: भारत, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, हाँगकाँग, युएई आणि ओमान. या स्पर्धेत एकूण १९ सामने खेळले जाणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना २८ सप्टेंबर २०२५ रोजी होईल.
हेही वाचा – IND vs ENG : जसप्रीत बुमराहचा नकोसा विक्रम! कसोटी कारकीर्दीतील नोंदवली सर्वात खराब कामगिरी
भारत-पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामने –
भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकाच गटात असल्याने स्पर्धेची मजा दुप्पट झाली आहे. दोन्ही संघांमध्ये अनेक सामने रंगणार आहेत. पहिल्यांदा ते लीग स्टेजमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतील. त्यानंतर सुपर-४ मध्येही त्यांचा सामना होईल. जर दोन्ही संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले, तर फायनलमध्येसुद्धा भारत-पाकिस्तान यांच्यात थरारक लढत पाहायला मिळेल.





