Ashok Kharat Case : विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषद सभागृहात (Ashok Kharat Case) उद्धव ठाकरे यांच्यासह ९ आमदारांचा निरोप समारंभ झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी तीव्र प्रतिसाद दिला. त्याचवेळी अशोक खरात (Ashok Kharat Case) प्रकरणावरून तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारला धारेवर धरण्यात येत असताना, शिंदे गटाच्या शिवसेना प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी ट्विट करत थेट ठाकरे कुटुंबीयांना लक्ष्य केले. यामुळे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शितल म्हात्रे यांच्यावर पलटवार केला. दोन्ही महिला नेत्यांमध्ये ट्विटरवरून चांगलीच छन्नाछन्नी रंगली आहे. शितल म्हात्रेचा ‘ताज का राज’ हल्ला शितल म्हात्रे यांनी अशोक खरात प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत ‘ताज का राज’ असा सवाल उपस्थित केला. त्यांनी ट्विट केले, “क्रूरकर्मा खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे… यही तो नही ‘ताज’ का राज? उबाठाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे. ‘ताज का राज’ फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल.” Ashok Kharat Case शितल म्हात्रे यांनी ताज हॉटेलमध्ये झालेल्या बैठकेचा उल्लेख करत खरातला पाण्याची लाईन देण्यासाठी कोणाची बैठक झाली, मध्यस्थी कोणी केली, पाईपलाइनचा जी.आर. काढण्यासाठी मातोश्रीमधून आदेश आले होते का आणि त्यामागे न्यूमरॉलॉजीची भूमिका होती का, असे सवाल उपस्थित केले. सुषमाताई, मूळ विषय हा ताजमध्ये झालेल्या मीटिंगचा आहे. त्यामुळे उगाच इकडे तिकडे उड्या मारू नका… खरातला पाण्याची लाईन देण्यासाठी ताजमध्ये कोणी बैठक घेतली होती? त्यासाठी मध्यस्थी करणारा नेता कोण होता? पाईपलाइनचा जी.आर. काढण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमने आदेश दिला होता की नाही ?… https://t.co/6CU6P8nZZK — sheetal mhatre (@sheetalmhatre1) March 26, 2026 सुषमा अंधारेचा पलटवार सुषमा अंधारे यांनी शितल म्हात्रे यांच्या ट्विटला तीव्र प्रत्युत्तर देत म्हटले, “अहो विषय भरकटवू नका. आपण तुमच्यावर संशोधन करायला बोलत आहोत. बाय द वे तुमचा व्हिडिओ मॉर्फ केलाय असं तुम्ही म्हणाला होतात. तोच तो सुर्वे प्रकरणातला, त्यातला नेमका ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो?” सुषमा अंधारे यांनी शितल म्हात्रे यांच्या पूर्वीच्या एका व्हिडिओ प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करून त्यांना चांगलेच टोमणे लगावले. शितल म्हात्रेचा सुषमा अंधारेंना टोमणा शितल म्हात्रे यांनी सुषमा अंधारे यांच्या ट्विटला रिप्लाय देताना म्हटले, “सुषमाताई, मूळ विषय हा ताजमध्ये झालेल्या मीटिंगचा आहे. त्यामुळे उगाच इकडे तिकडे उड्या मारू नका. खरातला पाण्याची लाईन देण्यासाठी ताजमध्ये कोणी बैठक घेतली होती? त्यासाठी मध्यस्थी करणारा नेता कोण होता? पाईपलाइनचा जी.आर. काढण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमने आदेश दिला होता की नाही? त्यामागे कुठली न्यूमरॉलॉजी होती? याची चर्चा व्हायला पाहिजे ना, ताई?” शितल म्हात्रे यांनी पुढे टोमणा मारत म्हटले, “ताई, त्यावेळी तुम्ही शिवसेनेत नव्हत्या, वंदनीय बाळासाहेबांना शिव्याशाप देण्यात आणि उबाठा व आदूबाळाला दहीहंडीच्या थरावर चढवण्यात मग्न होत्या. त्यामुळे तुम्हाला कदाचित माहिती नसेल. त्यामुळे ज्यांच्या आदेशाने तुम्ही ही टीवटीव करत आहात, त्यांना जाऊन विचारा – ‘ताज का राज’.” दोन्ही नेत्यांमधील (Ashok Kharat Case) ही ट्विटर छन्नाछन्नी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. अशोक खरात प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू झाली असून, दोन्ही गटांमध्ये तीव्र शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे.