Satara News : शहरातील गल्लीबोळात फिरणार्या मोकाट कुत्र्यांना अज्ञाताने खाऊतून विषारी औषध घातल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस (Satara News) आला आहे. विषबाधेमुळे सात मोकाट कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे आढळले असून याबाबत प्राणीमित्रांनी दिलेल्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश प्रल्हाद पवार (रा. रविवार पेठ, कराड) यांनी याबाबतची फिर्याद (Satara News) दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश पवार हे प्राणिमित्र असून गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता मंडई परिसरात कचराकुंडी शेजारी त्यांना दोन मृत कुत्री आढळली. याबाबत त्यांनी परिसरात चौकशी केली असता शहरातील इतर चौकांमध्येही अडगळीच्या ठिकाणी मृत कुत्री पडल्याचे त्यांना सांगण्यात आले. Satara News त्यामुळे गणेश पवार यांच्यासह संजू शहा, अशोक पवार, रोहन विभुते, शुक्रा जाधव, प्रमोद तोडकर, गणेश तपासे यांनी शहरातील कासार गल्ली, विठ्ठल चौक, चावडी चौक, दर्गा मोहल्ला, कन्या शाळा परिसर याठिकाणी पाहणी केली असता त्यांना सात मोकाट कुत्री मृतावस्थेत आढळली. प्राणीमित्रांनी त्या मृत कुत्र्यांना शहरातील पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. त्याठिकाणी (Satara News) पशुवैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी केली असता संबंधित कुत्र्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले. अज्ञाताने खाऊतून विषारी औषध दिल्याने संबंधित कुत्र्यांना विषबाधा झाल्याचा संशय असून प्राणीमित्र गणेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कराड शहर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.