Ashok Kharat Case : डॉक्टरांकडून अशोक खरातची HIV टेस्ट; समोर आला धक्कादायक रिपोर्ट
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण (Ashok Kharat Case) मोठ्या चर्चेचे केंद्र बनले आहे.

Ashok Kharat Case : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण (Ashok Kharat Case) मोठ्या चर्चेचे केंद्र बनले आहे. अशोक खरात याने अंकशास्त्र आणि भविष्य सांगण्याच्या बहाण्याने १५० हून अधिक महिलांचे शोषण केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे.
या प्रकरणातील (Ashok Kharat Case) नवनवीन माहिती समोर येत असून, खरातचा पाय दिवसेंदिवस अधिक खोलात जात आहे.
नाशिक पोलिसांनी खरातविरोधात आतापर्यंत ८ गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी ७ गुन्हे महिला अत्याचाराशी संबंधित आहेत. खरातला अटक करण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी आता विशेष पोलीस पथक (SIT) कडे सोपवण्यात आली आहे.
HIV टेस्ट निगेटिव्ह
महिलांवर अत्याचार केल्याच्या आरोपामुळे पिढीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी खरातची HIV टेस्ट केली होती. वैद्यकीय तपासात ही टेस्ट निगेटिव्ह आल्याचे समोर आले आहे. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी, प्रकरणातील इतर महिलांनी अद्याप तक्रार दाखल केलेली नाही.
दीड वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका
चौकशीदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दीड वर्षांपूर्वी अशोक खरात याने शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडली होती. त्याला अर्धांगवायूचा झटका आला होता. नंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याचा भक्त असलेल्या डॉक्टरनेच त्याच्यावर उपचार केल्याचे सांगितले जाते.
पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असून, या प्रकरणात (Ashok Kharat Case) आणखी काही मोठ्या व्यक्ती अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. SIT च्या चौकशीत कोणते नवीन खुलासे समोर येतात, याकडे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र उत्सुकता आहे.






