Ashok Kharat Case : अशोक खरातचा पाय आणखी खोलात; ‘या’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
नाशिकचा भोंदूबाबा म्हणून ओळखला जाणाऱ्या अशोक खरातच्या (Ashok Kharat Case) अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.

Ashok Kharat Case : नाशिकचा भोंदूबाबा म्हणून ओळखला जाणाऱ्या अशोक खरातच्या (Ashok Kharat Case) अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.
महिलांवर अत्याचार (Ashok Kharat Case) केल्याच्या अनेक तक्रारींनंतर आता त्याच्यावर POCSO Act (बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा) अंतर्गतही गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.
खरात (Ashok Kharat Case) याने शालेय विद्यार्थ्यांवर देखील अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या प्रकरणात आरोपी अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे. न्यायालयाने त्याला २९ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, विशेष पोलीस पथक (SIT) कडून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.
दरम्यान, खरातवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आल्यानंतर रुपाली पाटील – ठोंबरे यांनी सोशल मीडियावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली.
काय म्हणाल्या रुपाली पाटील – ठोंबरे?
“भोंदूबाबा १०वी नापास खरातने (Ashok Kharat Case) शालेय विद्यार्थ्यांनाही सोडले नाही. त्यांच्यावर त्याचे आई-वडील बाहेर थांबून नराधमाने अत्याचार केला. POCSO अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. राज्य महिला आयोग चाकणकर, तू संविधानाच्या पदावर बसून महाराष्ट्राचे माता-भगिनी-लेकरांचे कुटुंबाचे वाटोळे केले बाई. तात्काळ अटक झाली पाहिजे. तुझे चोचले पूर्ण करणाऱ्या लोकांसह १०० फटके मारून १ मोजले पाहिजे.” अशा तीव्र शब्दांत त्यांनी चाकणकरांवर निशाणा साधला.






