Ashok Gehlot : पायलट यांचे राजकीय वजन गेहलोत वाढू देणार नाहीत; भाजपचे टीकास्त्र
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) स्वपक्षाचे (कॉंग्रेस) नेते सचिन पायलट यांना अजूनही बालक समजतात. गेहलोत कधीच पायलट यांचे राजकीय वजन वाढू देणार नाहीत, असे टीकास्त्र भाजपने सोडले.

Ashok Gehlot : राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) स्वपक्षाचे (कॉंग्रेस) नेते सचिन पायलट यांना अजूनही बालक समजतात. गेहलोत कधीच पायलट यांचे राजकीय वजन वाढू देणार नाहीत, असे टीकास्त्र भाजपने सोडले.
राजस्थानमध्ये कॉंग्रेसची सत्ता असताना सप्टेंबर २०२२ मध्ये नाट्यमय स्वरूपाच्या राजकीय घडामोडी घडल्या. तत्कालीन मुख्यमंत्री गेहलोत (Ashok Gehlot) आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री पायलट यांच्यातील सत्तासंघर्षाच्या त्या परिणाम मानल्या गेल्या.
राजस्थानमधील पेचावर तोडगा काढण्यासाठी कॉंग्रेस श्रेष्ठींनी एक फॉर्म्युला तयार केला. त्यानुसार, गेहलोत यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, तर पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्याची योजना असल्याचे मानले गेले.
संबंधित योजना मार्गी लावण्यासाठी सप्टेंबर २०२२ मध्ये कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली. मात्र, त्या बैठकीपासून गेहलोत (Ashok Gehlot) समर्थक आमदार दूर राहिले. त्यांनी पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्यासही तीव्र विरोध दर्शवला. त्यामुळे कॉंग्रेसची योजना बारगळली. त्यावेळी गेहलोत आणि समर्थकांनी एकप्रकारे कॉंग्रेस श्रेष्ठींविरोधात बंडाचे निशाण फडकावल्याच्या चर्चा झडल्या.
गेहलोत (Ashok Gehlot) यांनी त्या चर्चा रविवारी फेटाळल्या. त्यावेळच्या घडामोडी म्हणजे कॉंग्रेस श्रेष्ठींविरोधातील बंड नव्हते. तर, पायलट यांना मुख्यमंत्री म्हणून बढती देण्याविषयीची आमदारांची असहमती होती, असे त्यांनी म्हटले. त्यावर भाजपचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांनी प्रतिक्रिया दिली.
गेहलोत यांची भूमिका म्हणजे त्यांच्या पक्षाशी निगडीत बाब आहे. मात्र, पायलट यांना राजकीयदृष्ट्या डॅमेज करण्याची संधी गेहलोत कधीच सोडत नाहीत. पायलट यांचे राजकीय वजन वाढत असल्याचे दिसताच गेहलोत दगाफटका करण्यास पुढे येतात, असे राठोड म्हणाले.






