‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्री आश्लेषा सावंत अडकली विवाहबंधनात

Ashlesha Savant | ‘क्योंकी सास भी कभी बहू थी ‘ फेम अभिनेत्री आश्लेषा सावंत विवाहबंधनात अडकली आहे. अभिनेता संदीप बसवानासोबत तिने आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरूवात केली आहे. लग्नाचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत तिने ही माहिती दिली आहे. सध्या त्यांच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आश्लेषा सावंत आणि संदीप बसवाना अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. साधारण 23 वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी 16 नोव्हेंबर रोजी वृंदावनातील चंद्रोदय मंदिरात लग्न केले. या लग्न सोहळ्याला फक्त कुटुंबातील सदस्यच उपस्थित होते. त्यांचे लग्न पारंपरिक विधींनुसार झाले.
लग्नासाठी आश्लेषा सावंतने लग्नासाठी सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसली होती. त्यावर मॅचिंग ज्वेलरी, सुंदर मेकअप, बांगड्या, केसांचा बन बांधला होता. आश्लेषा लग्नात खूपच सुंदर दिसत होती. तर संदीपने ऑफ-व्हाइट शेरवानी आणि मॅचिंग वास्कटमध्ये खूपच सुंदर दिसत होता. त्यांनी मॅचिंग फेटा आणि शाल घेऊन त्याने लूक पूर्ण केला.
View this post on Instagram
लग्नाचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत त्यांनी “आणि अगदी अशाच प्रकारे आम्ही आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरूवात केली. मिस्टर अँड मिसेस झालो…सर्व आशीर्वादांबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत,” असे खास कॅप्शन दिलं आहे. सध्या आश्लेषा आणि संदीपला कलाकार आणि चाहते नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत. Ashlesha Savant |
आश्लेषाला ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ मुळे खूप लोकप्रियता मिळाली. या सेटवरच दोघांची ओळख झाली होती. सध्या ती ‘झनक’ या मालिकेत दिसत आहे. संदीपने देखील आजवर अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तो शेवटचा ‘अपोलिना’ या मालिकेत दिसला होता. Ashlesha Savant |
हेही वाचा:
“आणखी एक धाडसी…”; ‘वीरू’च्या निधनानंतर अमिताभ बच्चन हळहळले, सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट





