नाशकातील अहिरे कुटुंबाला मिळाला मानाच्या वारकऱ्याचा ‘मान’

Ashadhi Ekadashi 2024 | आषाढ महिना आला की, आपल्या सगळ्यांना ओढ लागते ती आषाढी एकादशीची. आज आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. वर्षभरातील सर्व एकादशींपैकी ही एकादशी सर्वात महत्वाची आणि मोठी मानली जाते.
आषाढी एकादशीला ‘देवशयनी’ एकादशी आणि ‘महाएकादशी’ म्हणून ही ओळखले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक भागातून संतांच्या पालख्या या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. वारकऱ्यांची पायी वारी आज अखेर पंढरपुरातील पांडुरंगाच्या चरणी लीन झाली.
आषाढी एकादशीनिमित्त मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक ही शासकीय महापूजा पार पाडली. यंदा आषाढी सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत आषाढी एकाशीच शासकीय महापूजा नाशिक जिल्ह्यातील अहिरे कुटुंबानं केली. नाशिक जिल्ह्यातील अहिरे कुटुंब 16 वर्ष नित्यनियमानं पंढरीची वारी करतंय. बाळू शंकर अहिरे आणि त्यांच्या पत्नी आशाबाई बाळू अहिरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत मनोभावे आषाढी एकादशीची शासकीय महापूजा केली.
नाशकातील सटाणा तालुक्यातील अहिरे कुटुंबाला मिळाला मानाच्या वारकऱ्याचा मान मिळाला. तर आई वडिलांच्या पुण्यामुळेच विठुरायाच्या पूजेचा मान मिळाल्याची प्रतिक्रिया अहिरे दाम्पत्यानं एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
आषाढीच्या शासकीय महापुजेसाठी मानाचे वारकरी ठरलेल्या अहिरे कुटुंबाशी एबीपी माझानं बातचित केली आहे. एबीपी माझाशी बोलताना अहिरे म्हणाले की, “माझ्या आई-वडिलांची पुण्याई म्हणूनच पांडुरंगाच्या शासकीय पूजेचा मान मिळाला. कित्येक तास रांगेत उभा होता, त्यानंतर आम्हाला मान मिळाला. आम्हाला मान मिळणं हे आमचं भाग्यच समजतो आम्ही. गेल्या 16 वर्षांपासून नित्यनियमानं आम्ही वारी करतोय.”
आज संपूर्ण राज्यात आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. यातच मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. शिंदे यांनी सपत्निक ही शासकीय महापूजा पार पाडली.
शिंदे यांच्यासोबत नाशिक जिल्ह्यातील अहिरे कुटुंब यंदाच्या शासकीय महापूजेत सहभागी झाले. गेल्या १६ वर्षपासून अहिरे कुटुंब नित्यनियमानं पंढरीची वारी करतंय आहे. बाळू शंकर अहिरे आणि त्यांच्या पत्नी आशाबाई बाळू अहिरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत मनोभावे आषाढी एकादशीची शासकीय महापूजा केली.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील सटाणा तालुक्यातील अहिरे कुटुंबाला मानाच्या वारकऱ्याचा मान मिळाला. यावेळी अहिरे कुटूंबाने वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे. ते म्हणाले,’आई वडिलांच्या पुण्यामुळेच विठुरायाच्या पूजेचा मान मिळाला आहे. अशी प्रतिक्रिया अहिरे दाम्पत्यानं दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मोठ्या उत्साहात विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांनी बळीराजाला, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, राज्यातील प्रत्येक माणसाला चांगले दिवस येऊ देत, असं विठुरायाचरणी साकडं घातलं..







