मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

”आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, राज्यातील प्रत्येक माणसाला चांगले दिवस येऊ देत”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घातलं विठुरायाचरणी साकडं
Ashadhi Ekadashi 2024 | आज संपूर्ण राज्यात आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. यातच मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. शिंदे यांनी सपत्निक ही शासकीय महापूजा पार पाडली.
शिंदे यांच्यासोबत नाशिक जिल्ह्यातील अहिरे कुटुंब यंदाच्या शासकीय महापूजेत सहभागी झाले. गेल्या १६ वर्षपासून अहिरे कुटुंब नित्यनियमानं पंढरीची वारी करतंय आहे. बाळू शंकर अहिरे आणि त्यांच्या पत्नी आशाबाई बाळू अहिरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत मनोभावे आषाढी एकादशीची शासकीय महापूजा केली.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मोठ्या उत्साहात विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांनी बळीराजाला, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, राज्यातील प्रत्येक माणसाला चांगले दिवस येऊ देत, असं विठुरायाचरणी साकडं घातलं.
ते पुढे म्हणाले,’मी विठ्ठलाकडे नेहमी जनतेसाठी बळीराजासाठी मागणं मागत असतो. बळीराजा सुखी होऊ दे. चांगला पाऊस होऊ दे, चांगल पिक येऊ दे. त्याच्या जीवनात समृद्धी होई दे हे मागण बळीराजाकडे मागितल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या राज्यातील जनता सुखी होऊ दे. राज्यातील प्रत्येक घटक यांच्या जीवनात आनंदाचे दिवस विठ्ठलाने आणावे असं मागणं देखील मागितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आज सळीकडे भक्तीमय वातावरण झालं आहे. यावर्षी मागील वर्षीपेक्षा जास्त वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. पांडुरंगाच्या आशिर्वादाने राज्याचा कारभार सुरु आहे. या राज्यातील बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याचं पिक चांगलं येऊ दे, चांगला पाऊस येऊ दे शेतकऱ्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे’ असं मागणं विठ्ठलाला मागितल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.







