Asha Bhosle : जेष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका; ICU मध्ये दाखल!
सध्या त्यांना (Asha Bhosle) रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर सतत उपचार सुरू आहेत. रुग्णालयाकडून त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत आणि सविस्तर माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

Asha Bhosle : भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांची प्रकृती अचानक खालावल्याची बातमी समोर आली आहे. देशातील विविध भाषांमध्ये लाखो गाणी गाऊन प्रेक्षकांच्या मनात अमिट स्थान निर्माण करणाऱ्या आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील नामांकित ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सध्या त्यांना (Asha Bhosle) रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर सतत उपचार सुरू आहेत. रुग्णालयाकडून त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत आणि सविस्तर माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
मात्र, त्यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करणारे चाहते आणि संगीत क्षेत्रातील मान्यवर सातत्याने अपडेट्ससाठी रुग्णालयाशी संपर्क साधत आहेत.
आशा भोसले यांनी मराठीसह हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा अनेक भाषांमध्ये पार्श्वगायन करून भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक अजरामर नाव कमावले आहे. त्यांच्या खास आवाजाने आणि विविधतापूर्ण गायनशैलीने लाखो श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे.