Asha Bhosle Death : संपूर्ण देशाला आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना आज साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. तब्बल सहा दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा त्यांचा अमर आवाज आज कायमचा शांत झाला. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे दुपारी 4 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. (Asha Bhosle Death) १२ एप्रिल रोजी वयाच्या ९३व्या वर्षी मुंबई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर आज सकाळी लोअर परेल येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या वेळी सिनेसृष्टी, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यदर्शनासाठी अभिनेत्री तब्बू, आशा पारेख, अभिनेता रितेश देशमुख, गायक सुदेश भोसले, अभिनेते राकेश रोशन, नीना गुप्ता तसेच उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, आशिष शेलार यांसारख्या मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी मुंबई पोलिसांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. (Asha Bhosle Death) भारतरत्न लता मंगेशकर यांच्या लहान भगिनी असलेल्या आशाताईंनी हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली. आर. डी. बर्मन, ओ. पी. नैय्यर, सचिन देव बर्मन आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी दिलेली गाणी आजही रसिकांच्या हृदयात घर करून आहेत. अंत्यसंस्कारावेळी वातावरण अत्यंत शोकाकुल होते. गायक अनुप जलोटा आणि शान यांनी आपल्या सुरांतून श्रद्धांजली वाहत आशाताईंच्या आठवणींना उजाळा दिला. आशा भोसले यांचं जाणं ही केवळ सिनेसृष्टीची नाही, तर संपूर्ण देशाची मोठी हानी मानली जात आहे. त्यांच्या आवाजाचा वारसा मात्र पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. (Asha Bhosle Death) आशाताईंचा जीवनप्रवास दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या आशाताईंनी वयाच्या १० व्या वर्षी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आपल्या संगीत कारकिर्दीसोबतच त्या व्यावसायिक जगातही एक प्रमुख व्यक्तिमत्व होत्या. (Asha Bhosle Death) मुंबईपासून दुबईपर्यंत आशा ताईंचे साम्राज्य! आशा भोसले यांची एकूण संपत्ती २०० ते २५० कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. त्यांचे मुख्य उत्पन्नाचे साधन म्हणजे त्यांचे गायन आणि त्यांनी अनेक दशकांमध्ये गायलेली हजारो सुपरहिट गाणी. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक रेकॉर्डिंग करणारी कलाकार म्हणून नोंद असलेल्या आशाताईंनी आपल्या आवाजाच्या जोरावर केवळ प्रसिद्धीच नव्हे, तर प्रचंड संपत्तीही मिळवली. रेस्टॉरंट्सचे जागतिक साम्राज्य आशाताईंना स्वयंपाकाची प्रचंड आवड होती आणि त्यांनी आपल्या आवडीचे एका यशस्वी व्यवसायात रूपांतर केले. त्यांनी ‘आशाज’ नावाची आंतरराष्ट्रीय रेस्टॉरंट साखळी सुरू केली. याची पहिली शाखा २००२ मध्ये दुबईत उघडली. (Asha Bhosle Death) आज, त्यांची रेस्टॉरंट्स यूएई, कुवेत आणि बहरीनसारख्या आखाती देशांमध्ये, तसेच बर्मिंगहॅम आणि मँचेस्टरसारख्या यूकेमधील प्रमुख शहरांमध्ये लोकप्रिय आहेत. हा ब्रँड आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खाद्यसंस्कृतीचे प्रतीक बनला आहे. मुंबई आणि पुण्यातील आलिशान मालमत्ता आशा भोसले यांची जीवनशैली अत्यंत प्रतिष्ठित आणि आलिशान होती. त्यांच्या मालकीची अंदाजे ८० ते १०० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता होती. मुंबई आणि पुण्यातील उच्चभ्रू भागांमध्ये त्यांच्या महागड्या निवासी मालमत्ता होत्या. त्या त्यांच्या आलिशान आवडीनिवडींसाठी ओळखल्या जात होत्या, ज्यात त्यांच्या घरांची अंतर्गत सजावट आणि त्यांच्या वैयक्तिक फर्निचरचा समावेश होता. (Asha Bhosle Death) जागतिक दौरे, थेट संगीत कार्यक्रमांनी त्यांचा दर्जा उंचावला या वयातही आशाताईंची ऊर्जा स्पष्टपणे जाणवत होती. त्यांनी जगभरात थेट संगीत कार्यक्रम सादर केले. दुबई, त्रिनिदाद, अमेरिका आणि कॅनडा येथील त्याचे कार्यक्रम नेहमीच खचाखच भरलेले असायचे. या मैफिलींमुळे त्याला केवळ प्रचंड मानधनच मिळाले नाही, तर लाखो चाहत्यांचा चाहतावर्गही मिळाला. (Asha Bhosle Death)