“राज्यातील मुस्लिम लोकसंख्या ९० टक्क्यांपर्यंत…” ; भाजपच्या एआय व्हिडिओवर ओवैसींचे सडेतोड प्रत्युत्तर

Asaduddin Owaisi। भारतीय जनता पक्ष (भाजप) पुढील वर्षी (२०२६) होणाऱ्या आसाम विधानसभा निवडणुकीसाठी आधीच सज्ज झाला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा वारंवार हिंदू अल्पसंख्याक असल्याचा दावा करत आहेत. याला उत्तर म्हणून, आसाम भाजपने सोशल मीडियावर मुस्लिमांबद्दल एक एआय व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओचे शीर्षक आहे “आसाम विदाऊट बीजेपी.”
भाजपवर या व्हिडिओद्वारे हिंदू-मुस्लिम द्वेष भडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे, कारण त्यात फक्त मुस्लिमांचेच चित्रण आहे. याचा अर्थ असा की चहाच्या बागांपासून ते क्रिकेट स्टेडियमपर्यंत सर्वत्र मुस्लिम दिसतात. विमानतळ असोत किंवा उद्याने, त्यांचे सर्वत्र चित्रण केले आहे.
व्हिडिओमध्ये मुस्लिमांबद्दल काय म्हणाले ? Asaduddin Owaisi।
व्हिडिओमध्ये असे म्हटले आहे की, भाजपशिवाय राज्यातील मुस्लिम लोकसंख्या ९० टक्क्यांपर्यंत वाढेल, ज्यामुळे आसाममध्ये घुसखोरी करणे सोपे होईल. व्हिडिओचा शेवट लोकांना त्यांच्या मतांचा सुज्ञपणे वापर करण्याचे आवाहन करून होतो. आसाम काँग्रेस अध्यक्ष गौरव गोगोई यांना लक्ष्य करून आम्ही पैजानचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही असेही म्हटले गेले.
We can’t let this dream of Paaijaan to be true!! pic.twitter.com/NllcbTFiwV
— BJP Assam Pradesh (@BJP4Assam) September 15, 2025
ओवेसी आणि काँग्रेस कोंडीत Asaduddin Owaisi।
काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी या व्हिडिओबाबत निवडणूक आयोगावर निशाणा साधत त्यांनी, “भाजप अशा प्रकारे विष पसरवत आहे. ज्ञानेशजी, तुम्ही नेहमीप्रमाणे याचे समर्थन करत राहाल आणि मूक प्रेक्षक राहाल का?” असे त्यांनी म्हटले. एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही भाजपवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत, “हे हिंदुत्वाच्या घृणास्पद विचारसरणीचे खरे प्रकटीकरण आहे. त्यांचे स्वप्न मुस्लिममुक्त भारत आहे आणि त्यांच्याकडे कोणतेही दूरदृष्टी नाही.” असे म्हटले आहे.
भाजपने आपल्या बचावात काय म्हटले?
आसाम भाजपचे प्रवक्ते रूपम गोस्वामी यांनी परिस्थितीचा बचाव करताना, “आसामच्या १४ जिल्ह्यांमधील लोकसंख्याशास्त्रीय बदल पहा, येथील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. खरा धोका मुस्लिमांपासून नाही तर बेकायदेशीर मुस्लिम स्थलांतरितांपासून आहे. ते आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली झाले आहेत आणि आम्हाला नुकसान पोहोचवत आहेत.”





