Sharad Pawar : सरकारने 100 दिवसाचा कृती कार्यक्रम जाहीर करताच शरद पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर केला. सरकारने 100 दिवसाच्या कार्यक्रमाचा कृती कार्यक्रम जाहीर करताच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे राज्यात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारच्या या कृती कार्यक्रमावर नजर ठेवण्यासाठी शरद पवारांनी एक टास्क फोर्स तयार केली आहे. पक्षातील आमदार आणि खासदारांना विभानिहाय जबाबदारी देऊन सरकारच्या कामांवर लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे.
आज शरद पवार यांनी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाचं मूल्यमापण करण्यासाठी टीम तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच विभागनिहाय जबाबदाऱ्यांचंही वाटप करण्यात आजच्या बैठकीत करण्यात आले. येत्या 7 ते 8 तारखेपासून राष्ट्रवादीचे विभागनिहाय दौरे सुरु होतील अशी माहिती अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
कोणत्या नेत्यावर सोपवली जबाबदारी?
मराठवाडा- राजेश टोपे आणि जयप्रकाश दांडेगांवकर
विदर्भ- राजेंद्र शिंगणे आणि अनिल देशमुख
कोकण- जितेंद्र आव्हाड आणि सुनिल भुसारा
पश्चिम महाराष्ट्र- हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे
उत्तर महाराष्ट्र- हर्षवर्धन पाटील
पदाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश
शरद पवार यांनी सर्वांना विभागवार महाराष्ट्र पिंजून काढण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. पक्षसंघटनावाढीसाठी शरद पवार पक्षाचा नवा अजेंडा राबवताना दिसत आहे. पवार यांनी पदाधिकाऱ्यांना नव्या उमेदीनं कामाला लागा, असे आदेश दिले आहेत.





