Sharad Pawar : शरद पवारांनी रुग्णालयातून घरी येताच पुण्यात संपूर्ण पवार कुटुंबाला एकत्र बोलावलं; नेमकं काय आहे कारणं?
Sharad Pawar : संध्याकाळी 5.00 वाजता पुण्यातील मोदीबागमध्ये पवार कुटुंब एकत्र येणार आहे.

Sharad Pawar : पुण्यातील मोदीबाग या शरद पवारांच्या निवासस्थानी संपूर्ण पवार कुटुंबाला निमंत्रित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार रुग्णालयात उपचार घेत होते. दुसरीकडे संपूर्ण पवार कुटुंब बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार ( Sunitra Pawar) यांच्या प्रचारामध्ये व्यस्त होतं.
यानंतर आज संपूर्ण पवार कुटुंबाला स्नेहभोजनासाठी शरद पवारांनी आमंत्रित केल्याचे एका वृत्तवाहिनीने दिलेल्या महितीनुसार म्हंटले जात आहे. पार्थ पवार, सुनेत्रा पवार आणि जय पवार यांना देखील आमंत्रण देण्यात आलं आहे. संध्याकाळी 5.00 वाजता पुण्यातील मोदीबागमध्ये पवार कुटुंब एकत्र येणार आहे. (Sharad Pawar)

Sharad Pawar : शरद पवारांनी रुग्णालयातून घरी येताच पुण्यात संपूर्ण पवार कुटुंबाला एकत्र बोलावलं; नेमकं काय आहे कारणं?
सध्या शरद पवार (Sharad Pawar) पुण्यातील त्यांच्या मोदीबाग या निवासस्थानी आहेत, उद्या पुन्हा ते मुंबईला जाणार आहेत. आजच्या या मुक्कामा दरम्यान शरद पवारांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना जेवणासाठी आमंत्रित केले आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचं लग्न ठरले असल्याने याचं देखील निमित्त आहे का? की काही राजकीय घडामोड घडणार आहे? अशी देखील चर्चा होत आहे. Sharad Pawar
मात्र शरद पवार यांच्या निकटवर्तीयांकडून हा सोहळा पूर्णपणे कौटुंबिक असल्याचा सांगितलं जात आहे. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, युगेंद्र पवार, रोहित पवार, त्याचबरोबर ज्या व्यक्ती राजकीय क्षेत्रात नाहीत अशा सगळ्या पवार कुटुंबाला निमंत्रण देण्यात आलेलं आहे, पण यामध्ये प्रत्यक्ष सहभागी कोण होतं याकडे लक्ष राहणार आहे. Sharad Pawar
हेही वाचा:





