स्वप्निल जोशी आणि भाऊ कदमचे दिवाळी गिफ्ट; लवकरच एका खास चित्रपटात दिसणार एकत्र

Swapnil Joshi and Bhau Kadam | दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या चित्रपटातील ‘ओल्या साजं वेळी’ हे गाणं अत्यंत लोकप्रिय झालं.आता ‘प्रेमाची गोष्ट २’ या बहुप्रतीक्षित सिक्वेलमधून हेच गाणं एका नव्या प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात ललित प्रभाकर आणि रुचा वैद्य यांच्या मनमोहक केमिस्ट्रीची जादू पाहायला मिळणार आहे.
विशेष म्हणजे यात स्वप्निल जोशी आणि भाऊ कदम ही जोडी पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच हे दोघे एका वेगळ्या कथानकात आणि अनोख्या भूमिकांमध्ये एकत्र झळकणार आहेत. स्वप्नील ‘प्रेमाची गोष्ट २’मधून देवाच्या रूपात, नव्या शैलीत आणि भाऊ कदमसोबतच्या हटके केमिस्ट्रीमधून प्रेक्षकांसमोर येतोय.
सतीश राजवाडे यांचं जादुई दिग्दर्शन, रोमँटिक कहाणीची जादू आणि या जोडीची खास उपस्थिती, हे सगळं मिळून ‘प्रेमाची गोष्ट २’ प्रेक्षकांसाठी दिवाळीतील सर्वात सुंदर सिनेमॅटिक गिफ्ट ठरणार आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून, दिग्दर्शनाची जबाबदारी सतीश राजवाडे यांनी सांभाळली आहे. Swapnil Joshi and Bhau Kadam |
या चित्रपटात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्निल जोशी, भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रेम आणि नशिबाचा हा जादुई प्रवास प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभमुहूर्तावर २१ ऑक्टोबर रोजी अनुभवायला मिळणार आहे.
याआधी भाऊ कदम आणि स्वप्निल जोशी यांची जोडी झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या मंचावर एकत्र दिसली होती. ज्यामध्ये स्वप्निल परीक्षकांच्या भूमिकेत होता. मात्र आता पहिल्यांदाच हे दोघे एकत्र चित्रपटात काम करताना पाहायला मिळणार आहे. Swapnil Joshi and Bhau Kadam |
हेही वाचा:
“किमान २५,००० अमेरिकन लोक मृत्युमुखी पडले असते” ; अमेरिकन नौदलाकडून समुद्रात पाणबुडी नष्ट





