“भाऊ कदमकडून खूप काही शिकलो,” मनोज बाजपेयींनी केले कौतुक

Manoj Bajpayee and Bhau Kadam | विनोदी अभिनेता भाऊ कदम ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहचला. त्याची विनोदी शैलीने सर्वांची मनं जिंकून घेतली. निरागस हास्याने सर्वांचे मनोरंजन करणाऱ्या भाऊ कदमने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आपल्या अभिनयामुळे भाऊ कदम यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. याशिवाय त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अलीकडेच भाऊ कदम बॉलीवूड अभिनेता मनोज बाजपेयी यांच्या ‘इन्स्पेक्टर झेंडे’ या चित्रपटात पाहायला मिळाला. मनोज वाजपेयीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाऊचं कौतुक केलं आहे.
मनोज बाजपेयी म्हणाले, “भाऊ कदम यांना मी ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये पाहिलं होतं. भाऊ कदम यांच्याकडून मी खूप काही शिकलो. ते या सिनेमानिमित्त सतत आमच्याबरोबर होते. भाऊ कदम एकाच संवादाचे अनेक प्रकार आपल्या डोक्यात तयार करत असतात. ते इतके शांत असतात की, त्यांच्या आजूबाजूला कोणालाच कळणार नाही की, भाऊ कदम काय करत आहेत. अनेकांना वाटतं की, तो येतो आणि बोलतो. पण असं नाही, तो माणूस खूप विचार करत असतो.”
यानंतर मनोज बाजपेयी म्हणाले, “मी कधीकधी सीनबद्दल त्यांच्याबरोबर चर्चा करायचो, तेव्हा ते त्यांची मतं व्यक्त करायचे. तेव्हा मला जाणवलं की या माणसाचा भूमिकेबद्दलचा किती अभ्यास आहे. ते सतत विचार करत असतात. त्यामुळे भाऊ कदम येऊन उभे जरी राहिले तरी लाफ्टर येतो, त्याचं कारण त्यांचा अभ्यास आहे. ते एक अभिनेता म्हणून खूपच हुशार आहेत.” Manoj Bajpayee and Bhau Kadam |
दरम्यान, नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘इन्स्पेक्टर झेंडे’ या सिनेमात भाऊ कदम आणि मनोज बाजपेयी यांच्यासह सचिन खेडेकर आणि गिरीजा ओक, ओंकार राऊत, हरीश दुधाडे, वैभव मांगले हे कलाकार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरने केलं आहे.
हेही वाचा:





