WTA Player of the Year 2024 : आर्यना सबालेन्का ठरली ‘WTA टेनिस प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्काराची मानकरी…

St. Petersburg (USA) | बेलारूसची स्टार टेनिसपटू आरिना सबलेन्का ((Aryna Sabalenka ) हिला सोमवारी पहिल्यांदाच WTA प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. बेलारूसच्या 26 वर्षीय सबालेन्का हिने 2024 मध्ये दोन ग्रँड स्लॅम विजेतेपदे जिंकली आणि जागतिक क्रमवारीत अव्वल महिला टेनिसपटूही ठरली.
टेनिस मीडिया पोलच्या इतर निकालांमध्ये, एम्मा नवारोला मोस्ट इम्प्रूव्ड प्लेअर म्हणून गौरविण्यात आले. पॉला बडोसा हिला बेस्ट कमबॅक प्लेअर ऑफ द इयर आणि लुलू सनला वर्षातील नवोदित खेळाडू म्हणून निवडण्यात आले. तर सारा एरानी आणि जास्मिन पाओलिनीला वर्षातील सर्वोत्कृष्ट दुहेरी संघ म्हणून गौरविण्यात आले.
And the winners of the 2024 WTA Awards are…
🎖 Player of the Year: Aryna Sabalenka
🎖 Most improved player: Emma Navarro
🎖 Newcomer: Lulu Sun
🎖 Doubles of the Year: Paolini / Errani
🎖 Best Comeback: Paula Badosa👉 Do you approve? pic.twitter.com/ECNWvNg29M
— We Are Tennis (@WeAreTennis) December 10, 2024
वर्षातील सर्वोत्तम खेळाडू (Player of the Year) : आरिना सबलेन्का
नवोदित (Newcomer) : लुलु सन
सर्वाधिक सुधारित खेळाडू (Most improved player) : एम्मा नवारो
सर्वोत्तम पुनरागमन (Best Comeback) : पाउला बडोसा
सर्वोत्कृष्ट दुहेरी संघ (Doubles of the Year) : पाओलिनी / एरानी
सबलेन्का हिने 2024 मध्ये जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि सप्टेंबरमध्ये यूएस ओपन सह आणखी दोन विजेतेपद या मोसमात जिंकले. तिचा विजय-पराजय रेकॉर्ड 56-14 असा होता. तिने सुमारे एक कोटी डॉलर्सची बक्षीस रक्कम जिंकली. तिने ऑक्टोबरमध्ये इगा स्विटेकचा पराभव करून क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान प्राप्त केले होते.





