Arya Sports T20 Cricket Tournament : स्टार इलेव्हनचा सलग दुसरा विजय…

पुणे – शरदचंद्रजी पवार आणि अण्णासाहेब पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त खराडी जिमखाना व आर्या स्पोर्टस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आर्या स्पोर्टस टी-20 क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत स्टार इलेव्हन संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत दुसरा विजय मिळवला. खराडी जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सागर मल्लेपती (५८) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर स्टार इलेव्हन संघाने रिव्होल्यूशन संघाचा ५ गडी राखून पराभव केला.
दुसऱ्या सामन्यात संदीप शिंदे (८४) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर पूना स्पोर्ट्स संघाने २२ यार्डस संघाचा ७ गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.
निकाल: साखळी फेरी:
२२ यार्डस : २० षटकात ६बाद १६६ (योगराज देशमुख ५५, तुषार सिन्हा ४८ (श्रीनिवास लेहेकर २-२८, तारिक अन्सारी १-२७) पराभुत वि. पूना स्पोर्ट्स: १५.५ षटकात ३ बाद १६९ (संदीप शिंदे ८४, अमोल करमपुरी ४९ षटकात (तुषार सिन्हा १-२३, प्रसाद गुरव १-२४); पूना स्पोर्ट्स संघ ७ गडी राखून विजयी; सामनावीर -संदीप शिंदे;
रिव्होल्यूशन: २० षटकात ६ बाद १८९ (प्रतीक काळभोर नाबाद ६७, दर्शन दातीर ४५, (सूर्यकांत सरोज २-३६, राहूल ढाकणे २-३६, पराभुत वि.स्टार इलेव्हन: १७.३ षटकात ५ बाद १९० धावा (सागर मल्लेपती ५८, शशांक कश्यप ४३ (ऋतुराज गायकवाड २-४३, ध्रुव गव्हाणे १-२८); स्टार इलेव्हन संघ ५ गडी राखून विजयी. सामनावीर – सागर मल्लेपती;



