Arya Jadhav : अमरावती सोडून ‘आर्या जाधव’ झाली मुंबईकर; नवीन घराचा Video एकदा पाहाच !

Arya Jadhav : ‘एमटीव्ही’ या वाहिनीवरील ‘हॅसल-2’ या कार्यक्रमात रॅप प्रकारातील गायनातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अमरावतीकर ‘आर्या जाधव’ ही ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील स्पर्धक म्हणून समोर आली होती. हा सीजन आर्याने चांगलाच गाजवला होता.
टास्कदरम्यान आर्या व निक्कीमध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि नंतर आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. निक्कीच्या कानशिलात लगावत आर्याने ‘बिग बॉस’च्या नियमांचे उल्लंघन केलं होत. त्यानंतर तिला थेट शोमधून घरचा रस्ता दाखवण्यात आला होता. यावेळी आर्या ही बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसली.
आर्या जाधव ही उद्योजक हेमंत जाधव यांची मुलगी आहे. आर्याचा स्वतःचा बॅंडदेखील आहे. ‘qk’ नावाचा तिचा स्वतःचा बॅंड आहे. जो युट्यूबवर रॅप, गाणी करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. आर्या जाधवला ‘रॅपर गर्ल’ म्हणूनही ओळखलं जातं. सोशल मीडियावर तिचा चांगलाच दबदबा असतो. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते.
अश्यातच, आता अमरावतीकर ‘आर्या जाधव’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतंच तिने सोशलमिडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून, तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. आता ती अमरावती सोडून नवीन शहरात शिफ्ट झाली आहे. आर्याने नवीन घराचा व्हिडीओ शेअर करत घर सेट करत असल्याचं आणि ती कोणत्या शहरात शिफ्ट झालीये हे सांगितलं आहे. व्हिडीओद्वारे तिने ही माहिती सर्वांशी शेअर केली आहे.
मुळची अमरावतीची असलेली आर्या आता मुंबईकर झाली आहे. ती मुंबईमध्ये शिफ्ट झाली आहे. सामान शिफ्टिंग बद्दल तिने या व्हिडिओत सांगितलं आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत. तसेच तिला शुभेच्छा सुद्धा दिल्या. आर्या तिच्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच अपडेट राहते.





