Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे खासदार फोडण्यासाठी शिंदे गटाकडून ‘ऑपरेशन टायगर’ (Opration Tiger) राबवले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या आठ खासदारांमध्ये गुप्त बैठक झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Maharashtra politics) या कथित बैठकीत अरविंद सावंत, संजय दिना पाटील, राजाभाऊ वाजे यांच्यासह अन्य खासदारांची नावे चर्चेत आली होती. मात्र, ठाकरे गटाचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे खासदार अरविंद सावंत यांनी या बातम्यांचे जोरदार खंडन करत संताप व्यक्त केला आहे. Maharashtra politics Maharashtra politics : मोठी घडामोड..! ठाकरेंचे खासदार फुटणार? अरविंद सावंतांनी सगळंच सांगितलं “मला उभा चिरले तरी ‘मातोश्री’शी प्रतारणा करणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे, आपण ठाकरेंची साथ सोडणार नाही, असे त्यांनी एका कागदावर लिहून दिले. (Maharashtra politics) खासदार अरविंद सावंत पुढे म्हणाले की, मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगितला तेव्हा एका क्षणात मी पद सोडले. बाळासाहेबांनी आमदार आणि उद्धव ठाकरेंनी खासदार केले, त्यामुळे आईच्या दुधाशी गद्दारी मी कधीच करणार नाही. Maharashtra politics येत्या २४ एप्रिल रोजी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर अशा वावड्या उठवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ओमराजे निंबाळकर यांनीही या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा ‘लेटर वॉर’ आणि निष्ठेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. (Maharashtra politics)