अरविंद केजरीवाल यांना दोन माजी मुख्यमंत्र्यांची मुले देणार तगडी टक्कर; कोण होणार ‘क्लीन बोल्ड’?

Delhi Assembly Elections | दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तारखा अखेर 7 जानेवारी रोजी मंगळवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार आता ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. सलग 15 वर्षे दिल्लीत सत्तेत असलेल्या काँग्रेसला गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत खातेही उघडता आलेले नाही. त्यामुळे आता 5 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते आपले मैदान मजबूत करण्यात व्यस्त आहेत. तर भाजपने देखील जोरदार तयारी सुरु केली आहे.
सत्ताधारी आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजपने त्यांच्या काही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात आता नवी दिल्लीची जागा महत्त्वपूर्ण राहणार आहे. कारण येथून शीला दीक्षित जिंकून मुख्यमंत्री झाल्या होत्या. पुढे आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांचा पराभव करून तीच नवी दिल्लीची जागा जिंकली आणि आजपर्यंत ते या जागेवरून दिल्लीचे आमदार राहिले आहेत. यावेळीही या जागेवर आम आदमी पक्षाकडून अरविंद केजरीवाल हे उमेदवार आहेत. तर त्यांच्या विरुद्ध काँग्रेस आणि भाजपकडूनही उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.
या जागेवर काँग्रेसने संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे. संदीप दीक्षित हे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा मुलगा आहे.11 वर्षांपूर्वी केजरीवाल यांच्याकडून आईच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी ते मैदानात उतरले आहेत. याशिवाय भाजपकडुन उमेदवार प्रवेश वर्मा यांना संधी देण्यात आली आहे. ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत. या तिन्ही नेत्यांमधील लढतीमुळे नवी दिल्लीतील विधानसभा निवडणूक सर्वात मनोरंजक बनली आहे. याचाच अर्थ यंदा केजरिवाल यांची माजी मुख्यमंत्री पदावर असलेल्या दोन पुत्रांसोबत लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
नवी दिल्ली विधानसभेची जागा सर्वात महत्त्वाची
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी नवी दिल्ली विधानसभेची जागा ही सर्वात महत्त्वाची जागा आहे. 1993 पासून नवी दिल्ली विधानसभेच्या जागेवर सात वेळा निवडणुका झाल्या आहेत. या जागेवर पहिल्यांदाच निवडणूक झाली तेव्हा येथील भारतीय जनता पक्षाच्या कीर्ती आझाद यांनी काँग्रेसचे उमेदवार ब्रिजमोहन भामा यांचा पराभव केला. आश्चर्याची बाब म्हणजे या निवडणुकीनंतर भाजपला नवी दिल्लीची जागा पुन्हा जिंकता आलेली नाही. त्यानंतरच्या सहा निवडणुकांमध्ये काँग्रेसने तीनदा तर आम आदमी पक्षाने तीनदा विजय मिळवला आहे. Delhi Assembly Elections |
काँग्रेसची 15 वर्षांची राजवट संपुष्टात
दिल्ली विधानसभेसाठी 2013 मध्ये आम आदमी पार्टी या नव्या पक्षाने आपले नशीब आजमावले आणि पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांना या जागेवरून आव्हान देण्याचा निर्णय घेतला. या आव्हानात ते यशस्वी झाले आणि शीला दीक्षित आणि काँग्रेसची 15 वर्षांची राजवट संपवून सरकार स्थापन करण्यात ते यशस्वी झाले. केजरीवाल यांचा विजय किती मोठा होता. या जागेवर केजरीवाल यांना 44,269 मते मिळाली, तर शीला दीक्षित यांना 18,405 मते मिळाली. या जागेवर भाजपचे विजेंद्र गुप्ता १७,९५२ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होते. Delhi Assembly Elections |
संदीप दीक्षित
नवी दिल्ली मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने माजी खासदार आणि शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे. संदीप येथून अरविंद केजरीवाल यांना कडवी टक्कर देऊ शकतात, असा पक्षाला विश्वास आहे. 2004 आणि 2009 मध्ये पक्षाच्या तिकिटावर विजयी होऊन ते लोकसभेचे खासदार राहिले आहेत. मात्र, २०१४ मध्ये मोदी लाटेत त्यांनी ही जागा गमावली. नंतर पक्षाने त्यांना संघटनेतच पदे दिली. Delhi Assembly Elections |
प्रवेश वर्मा
भाजपने आपल्या पहिल्या यादीतच नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून प्रवेश वर्मा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सुनील यादव आणि आम आदमी पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेले विनोद बिन्नी या जागेवरून दावा करत होते. मात्र, सर्वांना मागे टाकत प्रवेश वर्मा यांनी या जागेवर आपला दावा पक्का केला.
संदीप दीक्षित यांच्याप्रमाणेच वर्मा हेही माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहेत. त्यांचे वडील साहेब सिंग वर्मा हे फेब्रुवारी १९९६ ते ऑक्टोबर १९९८ दरम्यान दिल्लीचे चौथे मुख्यमंत्री होते. प्रवेश वर्मा यांनी 2013 मध्ये पहिल्यांदा दिल्लीत विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते मेहरौली जागेवरून उभे राहिले आणि त्यांनी योगानंद शास्त्री यांचा पराभव केला, जे दिल्ली विधानसभेचे अध्यक्षही होते. Delhi Assembly Elections |
2014 मध्ये त्यांनी पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. याशिवाय 2019 मध्ये ते सलग दुसऱ्यांदा खासदार झाले. त्यांनी आम आदमी पार्टीच्या महाबल मिश्रा यांचा पश्चिम दिल्लीतून 5.78 लाख मतांनी पराभव केला, हा सर्वात मोठा विजय होता. Delhi Assembly Elections |
हेही वाचा:
Pune :पत्नीच्या छळामुळे तरुणाची आत्महत्या; पत्नी, सासूसह मेहुणीविरुद्ध गुन्हा दाखल





