Arvind Kejriwal : केजरीवाल यांची मोठी घोषणा! ‘या’ दिवशी पंतप्रधानांच्या निवासस्थानावर काढणार मोर्चा
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी इंधन पंपांवर ग्राहकांना शुद्ध पेट्रोल आणि ई २० यांपैकी एक निवडण्याचा स्पष्ट पर्याय देण्याची मागणी केली आहे.

Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी इंधन पंपांवर ग्राहकांना शुद्ध पेट्रोल आणि ई २० यांपैकी एक निवडण्याचा स्पष्ट पर्याय देण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी ४ ऑगस्ट रोजी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा काढून याचिका सादर करणार असल्याचे त्यांनी शनिवारी जाहीर केले.
नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे ई २० इंधनासंदर्भात आयोजित टाऊन हॉल बैठकीत ते (Arvind Kejriwal) बोलत होते. सोमवारी दुपारी याचिका गोळा करून सुमारे १०० लोकांसह लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
पेट्रोल पंपांवर ग्राहकांना कोणतेही एक इंधन निवडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. ई २० मिश्रित पेट्रोलचे दर कमी करण्यात यावेत, तसेच एकंदरीत पेट्रोलच्या किमतीत कपात केली जावी.
ई २० इंधनामुळे वाहनांचे कोणतेही नुकसान होत नाही, असा दावा सरकार ज्या अहवालाच्या आधारे करत आहे, तो संशोधन अहवाल सरकारने तात्काळ सार्वजनिक करावा, अशी मागणी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी (Arvind Kejriwal) केली. केंद्र सरकार म्हणते की अभ्यास करण्यात आला आहे आणि ई २० मुळे वाहनांना इजा होत नाही. मला तो अहवाल त्यांनी लोकां समोर आणावा असे वाटते, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला विविध राज्यांतील नागरिकांनी उपस्थिती लावून ई २० इंधनाच्या वापराबाबतचे आपले प्रत्यक्ष अनुभव आणि वाहनांमध्ये येत असलेल्या तांत्रिक अडचणींविषयीच्या समस्या मांडल्या.





